फरार आरोपीला कोथरूड पोलिसांनी केली अटक
By Admin | Updated: February 14, 2017 02:15 IST2017-02-14T02:15:26+5:302017-02-14T02:15:26+5:30
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सात महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख ५० हजारांच्या

फरार आरोपीला कोथरूड पोलिसांनी केली अटक
पुणे : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सात महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख ५० हजारांच्या चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी दिली. मयूर सतीश भरेकर (वय २०, रा. कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कोथरूड पोलिसांना खबऱ्यामार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौकामध्ये सापळा लावण्यात आला. (प्रतिनिधी)