शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूडमध्ये पानटपरी जवळील नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन केली तंबाखू न खाण्याची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 16:31 IST

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचा अनोखा उपक्रम

ठळक मुद्देआरोग्याचे रक्षण करून निरोगी आणि सुदृढ शरीर ठेवावे. असा संदेश यावेळी देण्यात आला

पुणे: नागरिक पान, तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट अशा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कॅन्सर सारख्या आजारांना आमंत्रण देत आहेत. त्यामुळे त्यांना जीवही गमवावा लागत आहे. भारतात दरवर्षी कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ३० ते ४५ टक्के आहे. अशा परिस्थितीत तंबाखू सेवनाला विरोध करण्यासाठी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाने अनोखा उपक्रम राबवला आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या पान टपरी जवळ जाऊन जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम राबवली होती. 

कोथरूड परिसरातील असंख्य मजूर पानटपरी वर तंबाखूजन्य गोष्टींचे सेवन करण्यासाठी येत असतात. त्यांना या उपक्रमातून तंबाखुचे हानिकारक परिणाम सांगण्यात आले. तंबाखूजन्य पदार्थांमुळे घसा, जीभ, आणि आतड्याचा कॅन्सर होतो. कावीळ सारख्या आजाराबरोबरच लिव्हर, किडनी, अन्ननलिकाही निकाम्या होतात. त्यामुळे अल्पवयातच मृत्यूला सामोरे जावे लागते.

 नागरिकांनी पान, गुटखा, तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकू नये. परिसरात स्वच्छता ठेवावी. तसेच आपल्या आरोग्याचे रक्षण करून निरोगी आणि सुदृढ शरीर ठेवावे. अस संदेश यावेळी देण्यात आला. तसेच जनजागृती उपक्रमात तंबाखू सम्राटांना गांधीगिरीच्या माध्यमातून गुलाबाचे फुल देऊन तंबाखू न खाण्याची विनंती करण्यात आली. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे, मुकादम वैजिनाथ गायकवाड, बापू साळवे, आणि सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcancerकर्करोगTobacco Banतंबाखू बंदी