कोरनाने रुग्ण दागवल्यसा त्याच्या उपचाराचा खर्च घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:50+5:302021-05-15T04:09:50+5:30
--- केडगाव : वरद विनायक हॉस्पिटलमध्ये कोरोनाने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची उपचाराची रक्कम घेणार नाही, असा आगळा वेगळा ...

कोरनाने रुग्ण दागवल्यसा त्याच्या उपचाराचा खर्च घेणार नाही
---
केडगाव : वरद विनायक हॉस्पिटलमध्ये कोरोनाने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची उपचाराची रक्कम घेणार नाही, असा आगळा वेगळा निर्णय केडगाव येथील वरद विनायक रुग्णालयाचे संचालक डॉ. सचिन भांडवलकर घेतला आहे.
कोरोनाच्या अातोनात खर्चामुळे रुग्ण मेटाकुटीला आले आहेत, त्यात रुग्ण दगावला तर त्यावर केलेले लाखो रुपये पाण्यात जातात व त्याचे नातेवाईकांवर अतिशय वाईट वेळ येते. अशा वेळेत नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी त्यांचे दु:ख वाटून घेण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून डॉ. भांडवलकर यांनी हा निर्णय जाहीर केला. त्या निर्णयाचे दौंडसह जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर स्वागत केले जात आहे.
केडगाव येथील वरद विनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भांडवलकर यांनी सेवाभावी वृत्तीतून आत्तापर्यंत एक हजार रुग्णांना कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढले आहे. विशेष म्हणजे डॉ. भांडवलकर यांच्याकडे उपचार घेत असताना आत्तापर्यंत हजारांमध्ये तब्बल ९८९ रुग्ण ठणठणीत झाले मात्र दुर्दैवाने ११ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण ठणठणीत झाल्यावर तो गरीब असल्यास त्याच्या बिलामध्ये घसघसीत सवलत देऊन त्याला सोडले जाते. गेल्या वर्षभरापासून कोविडच्या रुग्णांबाबत याच सेवाभावी वृत्तीने काम सुरु आहे. त्यामुळे त्यांची पुणे जिल्ह्यात केवळ औषधोपचाराचे पैसे घेऊन बरे करणारा डॉक्टर अशी ख्याती झाली आहे. दररोज १६ तास वैद्यकीय सेवा करून डॉक्टर भांडवलकर हे दररोज २ तास चौफुला येथील डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये विनामूल्य रुग्णांसाठी सेवा देत आहेत.
यासंदर्भात डॉ. सचिन भांडवलकर म्हणाले की, सध्या कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. सध्या माझ्याकडे १४ पासून तेेे २४ पर्यंत स्कोर असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या जास्त आहे. कोणत्याही डॉक्टरला उपचार देत असताना रुग्णाचा जीव वाचविणे हेच सर्वात मोठे ध्येय असते.