शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा प्रकरण: घर जाळल्याप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:03 IST

येरवड्याला रवानगी : सकट कुटुंबीयांचे जाळले होते घर

पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीमुळे जमाव बंदीचा आदेश असतानाही घराची तोडफोड करून ते जाळल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. विशेष न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांनी दोघांचीही रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.विलास श्रीधर वेदपाठक (वय ६०), गणेश विलास वेदपाठक ( वय २४, दोघेही रा. नरेश्वर वस्ती, कोरेगाव भीमा, शिरूर) अशी येरवडा कारागृहात रवानगी केलेल्या दोघांची नावे आहेत. नवनाथ ज्ञानोबा दरेकर, सोमनाथ फक्कडराव दरेकर, गोरक्ष पाटीलबुवा थोरात, गणेश गोरक्ष थोरात, विशाल काळुराम दरेकर (पाचही रा. सणसवाडी) आणि सुभाष गणपत धावटेरा (रा. वाडेगाव फाटा, कोरेगाव भीमा, शिरूर) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयदीप सुरेश सकट ( २४, रा. कोरेगाव भीमा) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ जानेवारी रोजी घडला.

सणसवाडी रास्ता-रोकोसणसवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामस्थ व महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करीत सणसवाडी ग्रामस्थांनी बुधवारी रास्ता रोको व गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. आत्महत्या केलेल्या पूजा सकट हिचे वडील सुरेश सकट यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.कोरेगाव भीमा जवळील वाडा पुनर्वसन येथे पूजा सकट हिने आत्महत्या केल्यानंतर नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सकट कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सकाळी सणसवाडीच्या माजी सरपंच आशा दरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव यादव, रामभाऊ दरेकर यांच्यासह इतर चार ते पाच जण सणसवाडी चौकात थांबले असताना त्या ठिकाणी मृत पूजाचे वडील सुरेश सकट त्यांना संरक्षणासाठी असलेल्या स्टेनगनवाल्या पोलिसांसह दुचाकीवरून आले. त्यांनतर त्यांनी आशा दरेकर यांना शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. दुपारंनतर जनजीवन सुरळीत झाले.जामिनावर २ मे रोजी सुनावणीफिर्यादी सकट कोरेगाव भीमा येथे राहत असताना त्यांचे घर फोडून जाळण्यात आले होते. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यातअ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर दोघांनीही जामीनासाठी न्यायलयात अर्ज दाखल केला असून त्यांच्या जामीनावर २ मे रोजी सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव