शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Koregaon-Bhima Violence: मोदींना संपवण्याचा नक्षलींचा कट, राजीव गांधींसारखीच करायची होती हत्या?; 'त्या' ई-मेलमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 14:57 IST

नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का?

पुणे - कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात नक्षलवाद्यांचा संबंध होता की नाही?, या दृष्टीकोनातून तपास सुरू असतानाच आणखी एक नवीन गौप्यस्फोट करणारी व धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांनी पैसा पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी माओवाद्यांशी संबंधित असलेल्या पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता मिळालेली नवीन माहिती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित असल्यानं खळबळ उडाली आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, या पाच जणांविरोधात अटकेची कारवाई केल्यानंतर पोलिसांना एक ई-मेल मिळाला आहे. यामध्ये नक्षलवाद्यांकडून माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडासारखं कृत्य पुन्हा घडवून आणण्यासाठी योजना आखण्यात येत असलेला मजकूर आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात याबाबत माहिती दिली. यावरुन नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मात्र, उज्ज्वला पवार यांनी कोर्टात तशी शंका स्पष्टपणे नाव पंतप्रधान मोदींचे घेऊन व्यक्त केलेली नाही. मात्र ई-मेलमध्ये आत्मघातकी हल्ल्याचा संदर्भ असून चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेलं एम 4 हे शस्त्राच्या खरेदी करण्याची योजना असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

(कोरेगाव-भीमा प्रकरण : एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांचा पैसा वापरला, पोलिसांना सापडले पुरावे)

बुधवारी(6 जून) पुणे पोलिसांनी मुंबई, नागपूर, दिल्लीतून सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, दीपक राऊत आणि रोना विल्सन यांना अटक केली. माआवोदी संघटनेशी संबंधित सुधीर ढवळे यांच्यासह अटक केलेल्या पाचही जणांचा बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) या संघटनेसोबत घनिष्ठ संबंध दर्शवणारे दस्ताऐवज प्राप्त झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. यामध्ये राजीव गांधी हत्याकांडासारखं आणखी घातक कृत्य करण्याची योजना सुरू असल्याचे याद्वारे आढळून आले.  

प्रकाश आंबेडकरांचा पत्रात उल्लेख

रोना विल्सन यांच्या कॉम्प्युटरमध्ये सापडलेल्या कागदपत्रात माओवादी फरार नेता मिलिंद तेलतुंबडे याने रोना विल्सन याला लिहिलेले एक पत्र मिळाले आहे. त्यात भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या काही नेत्यांचा उल्लेख आहे. त्यांची मदत झाल्याचे त्यात म्हटले गेले आहे. हे पत्र जानेवारी महिन्यातील असून, कोरेगाव-भीमा हिंसाचार झाल्यानंतरचे आहे. यात तथ्य किती आहे, याचा तपास  करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले. मिलिंद तेलतुंबडे याच्यावर सरकारनं 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.  

 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदी