शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोरेगाव भीमा : साडेदहा कोटींचे पंचनामे पूर्ण, जिल्हाधिका-यांची दंगलग्रस्त भागाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 06:57 IST

दंगलीतील कारवाईत निर्दोषांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नसल्याचे सांगत गावातील सामाजिक सलोख्याबाबत ग्रामास्थांवर कौतुकाची थाप जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी टाकली. तर पोलीस प्रशासन संवेदनशील व मानवी दृष्टिकोन ठेवून काम करत असल्याने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तपासासाठी ताब्यात घेतले म्हणजे गुन्हेगार नव्हे, असे ग्रामस्थ व महिलांना सांगत अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आश्वासित केले.

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा, सणसवाडी व अन्य ठिकाणच्या नुकसानीचे साडेदहा कोटींचे पंचनामे करण्यात आले असून, आॅडिटनंतर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार आहे. दंगलीतील कारवाईत निर्दोषांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नसल्याचे सांगत गावातील सामाजिक सलोख्याबाबत ग्रामास्थांवर कौतुकाची थाप जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी टाकली. तर पोलीस प्रशासन संवेदनशील व मानवी दृष्टिकोन ठेवून काम करत असल्याने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तपासासाठी ताब्यात घेतले म्हणजे गुन्हेगार नव्हे, असे ग्रामस्थ व महिलांना सांगत अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आश्वासित केले.कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील ग्रामस्थांना भेट देत श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील संभाजीमहाराज समाधीस्थळ व गोविंद गायकवाड यांच्याही समाधीस्थळाची जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पाहणी केली.या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे आदींसह घोडगंगाचे माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे, राष्ट्रवादीचे नारायणराव फडतरे, अशोक गव्हाणे, विक्रमराव गव्हाणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, पी. के. गव्हाणे, सरपंच संगीत कांबळे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, साहेबराव भंडारे, अंकुश शिवले, सरपंच रेखा शिवले, संतोष शिवले, सचिन भंडारे, सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते, गटविकास अधिकारी संदीप जठार, माजी सरपंच अजित दरेकर आदी उपस्थित होते.या वेळी कोरेगाव भीमा येथे उपस्थित शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमोर दंगलीच्या व पोलीस अटकसत्राबाबत व्यथा मांडल्या.यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बोलताना सांगितले, की येथील समन्वय समितीला विश्वासात घेऊनच दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. घराच्या व महिलांच्या स्व:रक्षणासाठी पुढे आलेल्या तरुणांबाबत त्यावेळची परिस्थिती व सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास करण्याचे यावेळी आश्वासन दिले. कोरेगाव भीमा व परिस्थितीवर मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेवून आहेत.कोरेगाव भीमा येथे जमा झालेल्या संतप्त महिलांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, दंगलीतील सीसीटीव्ही फुटेज तपासूनच गावातील समन्वय समितीला संशयास्पद लोकांची यादी देण्यात आली आहे. चौकशी करून संशयास्पद नसेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही.स्थानिकांवर झालेल्या हल्ल्याचा प्रतिकार तरुणांनी केला असुनही त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत असल्याची व्यथा यावेळी मांडली.पुन्हा पंचनामे करूकोरेगाव भीमा दंगलीत साडेदहा कोटींचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, पंचनाम्याबाबत शंका असल्यास पुन्हा पंचनामे करण्यात येतील, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. अद्यापही कोणाचे पंचनामे राहिले असल्यास त्यांचे नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर सर्वांना नुकसानभरपाई देण्यास सुरुवात होईल.समाधीची तपासणी करा-माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी वढू बुद्रुक येथील गोविंद गोपाळ यांच्या समाधीबाबत शासनाने तपासणी करण्याची मागणी करताच राव यांनी समाधीबाबत पुरातत्त्व व इतिहास संशोधक मंडळाची मदत घेऊ, असे सांगितले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे