शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Koregaon Bhima: कोरेगाव भीमा चौकशी आयोग नोंदवणार शरद पवारांची साक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:59 IST

मुंबई येथील मलबार येथे शासकीय सह्याद्री अतिथीगृह येथे येत्या २१ ते २५ फेब्रवारी दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५ या दरम्यान चौकशी आयोग सुनावणी घेणार

पुणे : माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार तसेच तत्कालिन अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, आयपीएस अधिकारी संदीप पखाले, पुणे ग्रामीणचे तत्कालिन पोलीस अधीक्षक सुवेज हक आणि हर्षाली पोतदार यांच्या महत्त्वपूर्ण साक्ष कोरेगाव भीमा चौकशी आयोग नाेंदवणार आहे, अशी माहिती चौकशी आयोगाचे सचिव व्ही. पळणीटकर यांनी दिली.

मुंबई येथील मलबार येथे शासकीय सह्याद्री अतिथीगृह येथे येत्या २१ ते २५ फेब्रवारी दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५ या दरम्यान चौकशी आयोग सुनावणी घेणार आहे. २३ आणि २४ फेब्रुवारी या दोन दिवस शरद पवार यांची साक्ष नोंदवणार असल्याचे व्ही. पळणीटकर यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचाराबाबत खासदार शरद पवार यांनी ही घटना पूर्वनियोजित होती. तसेच इतर काही वक्तव्य केली होती. त्या अनुषंगाने पवार यांनी सुनावणीत पुरावे तसेच साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे सचिव पळणीटकर यांनी सांगितले.

काेल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालिन पाेलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी हिंसाचाराची घटना घडल्यानंतर पेरणे फाटा येथील विजयस्तंभ व कोरेगाव भीमा येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यामुळे नांगरे-पाटील यांच्याकडे महत्त्वाचे कागदपत्रे अथवा माहिती असू शकते. त्यामुळे त्यांनाही आयोगाचे वकील ॲड. आशिष सातपुते यांनी पुण्यात झालेल्या सुनावणी दरम्यान आयोगाला पत्र देऊन बोलावण्याची मागणी केली होती. नांगरे-पाटील यांच्याकडून २५ फेब्रुवारी रोजी ही कागदपत्रे स्वीकारणार आहे.

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या मुंबईत अशा होणार सुनावण्या...

-  २१ आणि २२ फेब्रुवारी :- रवींद्र सेनगावकर, तत्कालिन अपर पोलीस आयुक्त, पुणे- २१ आणि २२ फेब्रवारी :- संदीप पखाले, आयपीएस अधिकारी- २३ आणि २४ फेब्रवारी :- शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खासदार- २३ आणि २४ फेब्रवारी :- सुवेज हक, तत्कालिन पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण-  २५ फेब्रवारी :- हर्षाली पोतदार (गरज पडल्यास २६ फेब्रुवारीलाही साक्ष नोंदवणार)-  २५ फेबु्रवारी :- विश्वास नांगरे-पाटील, तत्कालिन काेल्हापूर परिक्षेत्राचे पाेलीस महानिरीक्षक

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSharad Pawarशरद पवारCourtन्यायालयGovernmentसरकार