शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कोरेगाव भीमा प्रकरण : पारदर्शक तपासासाठी समन्वय समिती - विश्वास नांगरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:40 AM

कोरेगाव भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केली.

पुणे : कोरेगाव भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केली.ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी नांगरे पाटील यांनी सर्व दलित संघटनांची बैठक आयोजित केली होती़ या बैठकीत सर्व संघटनांनी प्रशासन, पोलीस यांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेवर तीव्र रोष व्यक्त केला़ त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली़कोरेगाव भीमा येथील घटनेबाबत दलित संघटनांशी चर्चा करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी बैठक बोलाविली होती़ या बैठकीला पोलीस अधीक्षक सुवेझ हक, उपमहापौर डॉ़ सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सर्व दलित संघटनांचे नेते उपस्थित होते़ या बैठकीत दलित नेत्यांनी प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर रोष व्यक्त केला़ त्यांनी सांगितले की, २९ डिसेंबरला वढूला घडलेल्या घटनेत अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता़ त्यानंतर ३० डिसेंबरला कोरेगाव ग्रामपंचायतीने १ जानेवारीला गाव बंद करण्याचा ठराव केला़ हा ठराव असंसदीय असल्याने त्याची माहिती मिळाल्यानंतरही प्रशासनाने व पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही़ सोशल मिडियावर १ जानेवारीला जमायचे असे संदेश फिरत होते़ तरीही त्याकडे दुर्लक्ष केले़ १ जानेवारीला हिंदुत्ववादी कार्यकर्ते झेंडे घेऊन जमावाने निघून २ किलोमीटरपर्यंत चालत आले नगर रोडपर्यंत आले तरीही त्यांना अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही़ सणसवाडी येथे मोडतोड सुरु केल्यानंतर सुरुवातीला बघ्याची भूमिका घेतली़ दलित समाजाचा विश्वास संपादन करायचा असेल तर संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि आनंद दवे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत़ त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी़ या भागातील सर्व व्हिडिओ फुटेज तपासावे़ तेथील मोबाईल टॉवरची माहिती घेऊन कोण कोणाशी संपर्कात होते, याची माहिती घ्यावी़ व्हिडिओत दिसतात, त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी दलित संघटनांच्या वतीने करण्यात आली, असे डॉ़ धेंडे यांनी सांगितले़विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, या घटनेचा पारदर्शक तपास होईल, आपल्याकडे जे काही इनपुट असेल, ते पोलिसांना द्यावेत़ पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी दलित संघटनांमधील १० जणांची समिती स्थापन करु़ ते पोलिसांना मदत करतील़ लोकांकडे असलेले मेसेज, व्हिडिओ याचे इनपुट देण्यासाठी त्यांनी एक मोबाईल क्रमांकही (८२०८७४६४०८) यावेळी सर्वांना दिला़ त्यावर माहिती पाठविण्याचे आवाहन केले़कोरेगाव भीमा प्रकरणात शांतता राहावी आणि चर्चा करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बैठक बोलावली होती. दंगली प्रकरणी आतापर्यंत दोन्ही समाजातील ४३ जणांना अटक केली आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, त्यानुसार तपास सुरू आहे.- सुवेझ हक, पोलीस अधीक्षकया समन्वयासाठी समितीमध्ये माझ्याबरोबर भारिप-बहुजन महासंघाचे म. ना. कांबळे, बीएसपीचे रमाकांत खंडे, विजयस्तंभ समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, अ‍ॅड. मखरे यांच्यासह वढू आणि कोरेगाव येथील दोन ग्रामस्थ, वकील यांचा समावेश असणार आहे.- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगाव