पुणे-सातारा महामार्गावर कोंडी
By Admin | Updated: November 23, 2015 00:37 IST2015-11-23T00:37:11+5:302015-11-23T00:37:11+5:30
केळवडे येथे पहाटेच्या सुमारास गॅसची वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या अपुऱ्या कामालगत पुणे-सातारा महामार्गावर पलटी झाला.

पुणे-सातारा महामार्गावर कोंडी
नसरापूर : केळवडे येथे पहाटेच्या सुमारास गॅसची वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या अपुऱ्या कामालगत पुणे-सातारा महामार्गावर पलटी झाला. यामुळे बारा तासांहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आज रविवारी पहाटे सातारा बाजुकडून पुणे बाजुकडे जाणारा टँकर (एमएच ०६ के ५७१५) हा सातारा महामार्गावरील केळवडे येथील रोहित हॉटेलजवळील रस्त्यालगत पलटी झाला.
रस्त्यावर जोरात पडल्याने या अपघातग्रस्त टँकरमधून वायू गळती सुरू झाली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी महामार्गाच्या दोन्ही बाजुस वाहतूक थांबवली. त्यामुळे वाहतूक सासवडकडून वळविण्यात आली. या वाहतुककोंडीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला.(वार्ताहर)