शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्कामोर्तब ! कोंढवा, आंबेगाव दुर्घटना निकृष्ट बांधकामामुळेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 19:34 IST

कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमधील सीमाभिंती पडून घडलेल्या दुर्घटनेचा अंतिम अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसीईओपीच्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर सीमाभिंतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचेभिंतींमध्ये पाणी मुरल्याने निर्माण झाला दबाव

पुणे : कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमधील सीमाभिंती पडून घडलेल्या दुर्घटनेचा अंतिम अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, पाणी मुरल्याने आणि झाडांच्या दबावामुळे या भिंती कोसळल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले असून उर्वरीत भिंतीचा भाग पाडून त्याठिकाणी नव्याने मजबूत भिंती बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

कोंढव्यातील अल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत २९ जून रोजी मध्यरात्री पडली होती. तर १ जुलै रोजी सिंहगड कॉलेजची सीमाभिंत पडली होती. कोंढव्यातील घटनेत १५ तर सिंहगड कॉलेजच्या दुर्घटनेत ६ असे एकूण २१ मजूर दगावले होते. या घटनांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. तसेच दोन्ही दुर्घटनांमधील बांधकामाची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणी करण्याची विनंती केली होती. सीओएपीचे तज्ञ डॉ. एम. एस. रणदिवे,  डॉ. आर. एस. दळवी आणि डॉ. आय. पी. सोनार यांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल तयार केला. हा अहवाल सोमवारी महापौरांना सुपूर्द करण्यात आला.

अल्कोन स्टायलस इमारतीतील सीमाभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होते. सोसायटीतील आतील बाजूस असलेल्या सिमेंट ब्लॉक मधून पाणी जमिनीत मुरत होते. तसेच सीमाभिंतीलगत वाहनेही लावण्यात येत होती. त्यामुळे दबाव वाढत गेल्याने निकृष्ट बांधकाम असलेली भिंत मजुरांच्या घरावर कोसळल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. या इमारतीची उर्वरित सीमाभिंतही धोकादायक असून ती पाडून नव्याने पक्की भिंत बांधावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

तसेच सिंहगड कॉलेजच्या सीमाभिंतीलाही जागोजाग तडे गेलेले आहेत. महाविद्यालयाची इमारत आणि सीमाभिंतीदरम्यान बांधलेल्या वर्कशॉपच्या छतावर पावसाचे पाणी साठत होते. हे पाणी वर्कशॉप आणि भिंतीदरम्यान असलेल्या भागात पडत होते. या ठिकाणी झाडे लावण्यात आली असून येथे पावसाळी गटाराचे पाणीही जमिनीत मुरत होते. त्यामुळे मातीचा दाब निर्माण होऊन भिंतीचा काही भाग कोसळला आणि झाडेही उन्मळून पडल्याने मजुरांच्या झोपड्यांचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. येथे शिल्लक राहिलेली उर्वरित सीमाभिंतही  पाडून नव्याने भिंत बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे.कोंढवा आणि सिंहगड कॉलेज सीमाभिंत दुर्घटनेनंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमध्ये सीओईपीचे प्राध्यापक बिराजदार यांना सहभागी करुन घेण्यात आले होते. त्यांनी दोन्ही घटनांच्या ठिकाणच्या बांधकामाचा अभ्यास करुन त्याचा अहवाल ४ जुलैरोजी पालिकेला दिला होता. सर्वसाधारण सभेमध्ये उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी या अहवालावर प्रश्न उपस्थित करीत अहवालाच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली होती. प्राध्यापक बिराजदार, डॉ. दळवी आणि तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालातील निष्कर्ष सारखेच आहेत. 

टॅग्स :KondhvaकोंढवाAccidentअपघातDeathमृत्यू