शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:22 IST

आज दुपारी दोन वाजता कात्रज-कोंढवा रस्ता येथे बस टेम्पो व व्हॅनच्या झालेल्या भीषण अपघातात सुदैवाने चालक बचावल्याची घटना घडली. रस्त्यावर उतारावरून बसने टेम्पोला व पुढे असणाऱ्या व्हॅनला टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोचालक त्या टेम्पोमध्येच अडकला होता.

कोंढवा - आज दुपारी दोन वाजता कात्रज-कोंढवा रस्ता येथे बस टेम्पो व व्हॅनच्या झालेल्या भीषण अपघातात सुदैवाने चालक बचावल्याची घटना घडली. रस्त्यावर उतारावरून बसने टेम्पोला व पुढे असणाऱ्या व्हॅनला टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोचालक त्या टेम्पोमध्येच अडकला होता. तेथील नागरिकांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राचे जवान व क्विक रिस्पॉन्स टीमचे वाहन घटनास्थळी तातडीने दाखल झाले. हडपसर-कात्रज या बस क्र. २९१ चे ब्रेक निकामी झाल्याने बसने तीन गाड्यांना धडक दिली. यातटेम्पोचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले.कात्रजकडून हडपसरकडे जाणारी बस क्र. २९१ ही बस टिळेकरनगर येथे बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसने प्रथम चारचाकीला (एमएच १४, जीयू, ४१६२) ठोकर मारली. चारचाकी बाजूला गेल्यावर बसने टेम्पोला (एमएच १२, एफडी ८९८) धडक दिली. टेम्पोने ओमनी या गाडीला मागून धडक दिली.या तिहेरी अपघातात टेम्पोचालक महादेव तुकाराम रेणूसे (वय ४०) टेम्पोत अडकून बसला. मग अग्निशमन दलाला पाचारण केले व रेणूसे यांना बाहेर काढले.१ जवानांनी प्रथम टेम्पोचालकाची परिस्थिती पाहून पुढील बचावकार्यास सुरुवात केली. जवानांनी त्या तीनचाकी टेम्पोमधील चालकाशी संभाषण चालू ठेवत त्याची लवकरच सुटका करीत असल्याचे सांगितले. दलाकडील कटर, स्प्रेडरचा वापर करून शक्कल लढवत अवघ्या पंधरा वीस मिनिटात चालकास जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.२ टेम्पोचालकाच्या कंबरे खालील भागाला गंभीर दुखापत झाल्याचे तसेच टेम्पो व व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. बसच्या पुढील भागाच्या काचा फुटल्या असून बसमधे प्रवासी असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळल्याची चर्चा प्रथमदर्शनी नागरिकांमध्ये होती. नेमका अपघात कसा झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.३ टेम्पोचालकाला तत्परतेने बाहेर काढण्यामध्ये कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राचे तांडेल सुभाष जाधव व वाहनचालक सुखदेव गोगावले तसेच जवान विशाल यादव, संदीप पवार व क्विक रिस्पॉन्स टीमचे राहुल जाधव, ओंकार ताटे, अविनाश लांडे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्या