मतदार नोंदणीची स्थिती कळणार
By Admin | Updated: July 5, 2014 23:38 IST2014-07-05T23:38:32+5:302014-07-05T23:38:32+5:30
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता.

मतदार नोंदणीची स्थिती कळणार
पुणो : राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. यात 2 लाख 59 हजार मतदारांनी नाव नोंदणी केली. त्यांचे अर्ज 15 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाच्या 666.ूी.ेंँं1ं2ँ31ं.ॅ5.्रल्ल या संकेतस्थळावर दिसतील. आत्तापर्यंत 65 हजार अर्ज संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेअसून या अर्जाची स्थिती पाहता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे बहुतांश मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले होते. अगामी विधानसभा निवडणुकीत या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम राबविला होता. नोकरदारांना नाव नोंदणी करणो सोयीचे व्हावे यासाठी या महिन्यातील 21,28 व 29 जूनला विशेष मोहिम राबविली होती. जिल्ह्यातील 7 हजार 258 मतदान केंद्रावर नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. महिनाभरात जवळपास 2 लाख 59 हजार नागरिकांनी नाव नोंदणी केली.
अंतिम मतदार यादी 31 जुलै रोजी प्रसिध्द
यापुर्वी मतदार यादीतून नाव वगळलेल्या 1 हजार 359 जणांनी पुन्हा नाव नोंदणी केली होती. नोंदणीचे दावे व हरकती 15 जुलेै पर्यंत निकाली काढले जाणार आहेत. तर अंतिम मतदार यादी 31 जुलै रोजी प्रसिध्द केली जाईल. मतदारांना अर्जाची स्थिती ऑनलाईन समजणार आहे. त्या साठी निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘न्यू फॉर्म’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.