स्मार्ट सिटीसाठी जाणून घेणार मते
By Admin | Updated: July 6, 2015 05:07 IST2015-07-06T05:07:32+5:302015-07-06T05:07:32+5:30
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेशासाठी महापालिकेतर्फे नागरिकांचे अभिप्राय घेण्याच्या सूचना सरकारतर्फे करण्यात आल्या आहेत.

स्मार्ट सिटीसाठी जाणून घेणार मते
पिंपरी : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेशासाठी महापालिकेतर्फे नागरिकांचे अभिप्राय घेण्याच्या सूचना सरकारतर्फे करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सोमवारपासून प्रभागनिहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारतर्फे देशातील १०० शहरांत आणि महाराष्ट्रातील १० शहरांत स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येणार आहे. शहरांमध्ये काही निकषांच्या आधारे स्पर्धा होणार असून, त्यातून ही शहरे निवडली जाणार आहेत.
बहुतांशी निकष पिंपरी-चिंचवड महापालिका पूर्ण करीत असून, त्यामध्ये समावेश होणे शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी निकष व केंद्र, राज्य सरकारच्या सूचनांप्रमाणे विविध गोष्टींचा अंतर्भाव करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्यापासून प्रभागनिहाय सभा घेऊन नागरिकांचे अभिप्राय घेतले जाणार आहेत. (प्रतिनिधी)