शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री म्हणतात, कोयता गँगला ठोकून काढा; पोलिसांच्या एफआयआरमधून 'कोयता' गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2023 12:28 IST

पुण्यात वेगवेगळ्या भागात दहशत पसरविण्याचे प्रकार घडल्याने त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले

पुणे : एका बाजूला मंत्री कायदा, सुव्यवस्थेवर बोलताना ‘कोयता गँगला’ ठोकून काढा, असे पोलिसांना सांगत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमधून ‘कोयता’ गायब झाला आहे. गुन्हा करताना वापरलेल्या कोयत्याच्या जागी धारदार अथवा तीक्ष्ण हत्यार असे शब्द आले आहेत. त्यामुळे अचानक कोयता गँग गायब झाली की, गुन्हेगारांनी कोयते वापरणे बंद केले? अशी चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत हे रविवारी पुण्यात आले असताना त्यांनीही पुण्यातील कोयता गँगचा उल्लेख करताना दहशत पसरवणे हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे कोयता गँगला ठोकून काढा, असे मी पोलिसांना सांगणार आहे, असे त्यांनी म्हटले.

पुण्यातील गुंडांनी कोयत्याचा वापर करून शहराच्या वेगवेगळ्या भागात दहशत पसरविण्याचे प्रकार घडल्याने त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले होते. शहर पोलिसांनी कोयत्यांचा वापर करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. कोयता विकत घेणाऱ्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स घेण्याबरोबर कशासाठी तो ते खरेदी करतो?, याची माहिती घेण्याची सक्ती विक्रेत्यांवर केली.

हत्याराचे उल्लेख टाळण्याचा प्रयत्न

यापूर्वी शहरात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये कोणत्या हत्याराचा वापर केला? याचा उल्लेख होत असे. दरम्यान, गेल्या एक ते दीड महिन्यांपासून शहरात दाखल गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या हत्यारांमधून कोयता, पालघन अशा हत्यारांचा उल्लेख टाळून फक्त धारदार हत्यार, असे म्हटले जाऊ लागले आहे.जखम कोणत्या हत्याराने केली? एफआयआर नोंदविताना त्यात वापरलेल्या हत्याराचा स्पष्ट उल्लेख केला गेला पाहिजे. फिर्यादीवर झालेल्या जखमांची डॉक्टरांच्या अहवालात जखम किती खोल, कोणत्या हत्याराने झाली असावी, याचा उल्लेख आवश्यक असतो. अनेकदा पंच उलटतात. त्यामुळे त्याचा फायदा अनेकदा आरोपीला होत असल्याचे ॲड. मिलिंद पवार यांनी सांगितले.

गंभीर गुन्हे कागदावर दिसत नाहीत

आपल्या हद्दीत गंभीर गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून यावे, म्हणून गंभीर प्रकरणातही किरकोळ कलम लावण्याचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येत आहे. गंभीर जखमी झालेल्याची पोलिस आयसीयूमध्ये जाऊन फिर्याद घेतात. असे असतानाही कलम मात्र किरकोळ मारहाणीचे लावल्याचे अनेक गुन्ह्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कागदावर दिसताना कमी दिसून येऊ लागले आहे.

फिर्यादीला अनेकदा हत्यार कोणते होते?, हे सांगता येत नाही. तसेच कोयत्यांमध्येही अनेक प्रकार आहे. हत्यार जप्त करताना त्याचा पंचनाम्यात त्याचा सविस्तर उल्लेख केला जातो. त्याच वेळी पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्याला मोकळीक दिली. गुन्हे का वाढले?, याची विचारणा करण्याऐवजी डिटेक्शनवर भर दिला तर गुन्हे लपविण्याचे अथवा तडजोडीचे प्रकार होणार नसल्याचे एक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकministerमंत्री