किशोर धनकवडे यांचे नगरसेवकपद अडचणीत

By Admin | Updated: July 3, 2017 03:10 IST2017-07-03T03:10:03+5:302017-07-03T03:10:03+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर उर्फ बाळासाहेब धनकवडे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने

Kishore Dhankwade's corporator faces trouble | किशोर धनकवडे यांचे नगरसेवकपद अडचणीत

किशोर धनकवडे यांचे नगरसेवकपद अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर उर्फ बाळासाहेब धनकवडे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवकपद अडचणीत आले आहे. समितीच्या या निर्णयाविरूध्द धनकवडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान प्रशासनाने त्यांचे नगरसेवक पद रदद् करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी ठेवला
आहे.
महापालिका निवडणूकीत धनकवडी प्रभाग क्र. ३९ अ मधून धनकवडे हे विजयी झाले होते. त्यांच्या प्रमाणपत्राबाबत मृणाल ढोले पाटील यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. किशोर धनकवडे यांच्या शाळेतील दाखल्यावर हिंदू-मराठा अशी जात नमूद करण्यात आल्याने ते कुणबी प्रवर्गातून निवडणूक लढवू शकत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. जिल्हा जात पडताळणीच्या निर्णयानुसार महापालिका प्रशासनाने कार्यवाहीस सुरू केली आहे. पालिकेच्या निवडणूक विभागाने धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे मंजुरीसाठी ठेवला आहे.याबाबत किशोर धनकवडे म्हणाले, ‘‘जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने माझी कुठलीही बाजू ऐकून न घेता परस्पर निकाल दिला आहे. माझा जातीचा दाखल वैध असल्याबाबत अनेक पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात मी उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे.’’

Web Title: Kishore Dhankwade's corporator faces trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.