संमेलनाध्यक्षपदाबाबतचे किर्लोस्करांचे ’ते’ भाकित खरे ठरले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:13 AM2021-01-25T04:13:45+5:302021-01-25T04:13:45+5:30

पुणे : ‘‘खूप वर्षांपूर्वी ‘किर्लेास्कर’ मासिकात माझी एक कथा छापून आली होती. तेव्हा मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले होते की, तुम्ही ...

Kirloskar's prediction about the post of convention president came true .... | संमेलनाध्यक्षपदाबाबतचे किर्लोस्करांचे ’ते’ भाकित खरे ठरले....

संमेलनाध्यक्षपदाबाबतचे किर्लोस्करांचे ’ते’ भाकित खरे ठरले....

Next

पुणे : ‘‘खूप वर्षांपूर्वी ‘किर्लेास्कर’ मासिकात माझी एक कथा छापून आली होती. तेव्हा मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले होते की, तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल, पण त्यांना मी म्हणालो की, ‘मी स्वत:ला साहित्यिक समजत नाही. कारण माझा साहित्यातील अनुभव फार कमी आहेे.’ पण आज किर्लोस्करांचे ते भाकित खरे ठरले. साहित्य संंमेलन हा खूप मोठा मेळा आहे. संमेलनाध्यक्षपद हे एकप्रकारचे आव्हान असून, ही जबाबदारी खूप मोठी असल्याची भावना नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. नारळीकर यांची रविवारी साहित्य महामंडळाच्या बैठकीत बहुमताने निवड झाली. साहित्य संंमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान लेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे साहित्य, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञान आणि साहित्याची सांगड, विज्ञानवादी दृष्टीकोन, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी होणारे प्रयत्न अशा विविध विषयांवर त्यांनी पत्रकारांशी ‘झूम’ मिटिंगद्वारे संवाद साधला.

एक विज्ञानवादी लेखक साहित्य संमेलनाध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे यापुढील काळात विज्ञान साहित्याला अधिक प्रतिष्ठा मिळेल. यंदाच्या साहित्य संमेलनात विज्ञानाचा प्रसार करण्याबरोबरच समाजातील अंंधश्रद्धा दूर करण्यास देखील निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहित्यात विज्ञान हे दोन त-हेने येऊ शकते. विज्ञानामध्ये जी नवीन संशोधन होतात त्याची माहिती साहित्यातून लोकांपर्यंत पोहोचविली जाऊ शकते आणि विज्ञान कथा देखील साहित्यामधून पोहोचविता येऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले.

गेल्या 93 वर्षात साहित्य संमेलनामध्ये फारसा सहभागी झालो नाही. काही वर्षांपूर्वी डोंबिवली येथील साहित्य संंमेलनात माझी मुलाखत घेण्यात आली होती. तितकाच काय तो माझा संंमेलनाशी जवळून संबंध आला. आजवर विज्ञानविषयक संंमेलनामध्येच अधिक सहभागी झाल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

समाजामधील विज्ञानवादी दृष्टीकोनाबददल सांगताना ते म्हणाले, एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने जरी प्रगती केली असली तरी विज्ञानवाद अजूनही दिसत नाही. लोक मोबाईलसारख्या तंत्रज्ञानाचा वापर कुठले दिवस शुभ किंवा अशुभ आहेत हे पाहाण्यासाठी करतात. तंत्रज्ञानाचा उपयोग अंधश्रद्धधेसाठीच केला जात आहे. लोकांची धारणा अजूनही बदललेली नाही. त्यामुळे एकप्रकारची निराशा जाणवते.

-----------------------------------------------

मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवं

विज्ञान किंवा गणिताचे मुलांना मराठी भाषेतूनच शिक्षण द्यायला हवे. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातले तरच मुलांची प्रगती होणार आहे, असा एक समज पालकांमध्ये आहे. पण पालकांना हे कोण समजावणार की, यामुळे आपण मराठीतले वाचक कमी करत आहोत, याकडे डॉ. नारळीकर यांनी लक्ष वेधले.

---------------------------------------

मराठी ‘ज्ञानभाषा’नव्हे ‘विज्ञानभाषा’ व्हायला हवी

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी ती ज्ञानभाषा होईल का? याविषयी विचारले असता मराठीला ज्ञानभाषा मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण ती केवळ ज्ञानभाषा न होता विज्ञानभाषा व्हायला हवी अशी अपेक्षा डॉ. नारळीकर यांनी व्यक्त केली.

----------------------------------------------

Web Title: Kirloskar's prediction about the post of convention president came true ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.