किरण शेलार यांना पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती

By Admin | Updated: January 1, 2017 04:34 IST2017-01-01T04:34:25+5:302017-01-01T04:34:25+5:30

मुंबई पोलीस दलात अपर पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले किरण रामचंद्र शेलार यांना महाराष्ट्र शासनाने पदोन्नती दिली आहे. त्यांना राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक

Kiran Shelar promoted as IG | किरण शेलार यांना पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती

किरण शेलार यांना पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती

पुणे : मुंबई पोलीस दलात अपर पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले किरण रामचंद्र शेलार यांना महाराष्ट्र शासनाने पदोन्नती दिली आहे. त्यांना राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व विशेष पथके) मुंबई या महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
शेलार यांनी या आधी जळगाव, धुळे, नाशिक, नांदेड, मुंबई, कल्याण, ठाणे, पुणे या विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना उत्तम कामगिरी बजावली आहे. धुळे येथील भास्कर वाघ (जिल्हा परिषद घोटाळा), नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आंदोलने, नांदेड जिल्ह्यातील नक्षलवादी समस्या, मुंबई, ठाणे येथील गुन्हेगारी टोळ्यांचा बीमोड आणि विविध ठिकाणच्या जातीय दंगली या सर्व प्रसंगी त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. शेलार हे पुण्यातील शिरूर तालुक्यातील निर्वी गावचे रहिवासी असून, स्व. रामचंद्र बापूराव शेलार यांचे सुपुत्र आहेत.

Web Title: Kiran Shelar promoted as IG