खामगाव चौकात काटेरी झुडपांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:08 IST2021-06-05T04:08:27+5:302021-06-05T04:08:27+5:30

गाडी मोडी चौक हा शेलारवाडी, खामगाव, तांबेवाडी आणि यादववाडी या चार वाड्यांना एकाच ठिकाणी जोडणारा मुख्य चौक म्हणून ...

Kingdom of thorn bushes in Khamgaon Chowk | खामगाव चौकात काटेरी झुडपांचे साम्राज्य

खामगाव चौकात काटेरी झुडपांचे साम्राज्य

गाडी मोडी चौक हा शेलारवाडी, खामगाव, तांबेवाडी आणि यादववाडी या चार वाड्यांना एकाच ठिकाणी जोडणारा मुख्य चौक म्हणून मानला जातो. मात्र या चौकात मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे वाढली आहेत. ही काटेरी झुडपे काढून या ठिकाणी देशी झाडांच्या लागवडी करून या चौकाचे सुशोभीकरण करून वैभवात भर घालण्याची मागणी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे. या परिसराकडे स्थानिक पुढाऱ्यांचे व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. हा परिसर स्वच्छ करून या भागात वृक्षलागवड करण्याची गरज आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर असते, तेही कमी करण्याची गरज ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. चौकात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर खड्डे असून, हे खड्डे भरले तर या चौकाला मोठे स्वरूप प्राप्त होणार आहे

खामगाव गाडी मोडी चौकात काटेरी झुडपांचे साम्राज्य.

Web Title: Kingdom of thorn bushes in Khamgaon Chowk