शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Alphonso Mango: पुण्यात 'फळांचा राजा' खातोय भाव; जाणून घ्या आंब्यांचे दर...!

By अजित घस्ते | Updated: April 25, 2023 18:27 IST

यंदा मात्र अवकाळी पाऊस आणि सततच्या वातावरणातील बदलांमुळे बाजारात हापूसची आवक कमी

पुणे: उन्हाळयात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आवडते फळ म्हणजे कोकणचा राजा हापूस मात्र चार ते पाच वर्षे नंतर पहिल्यांदाच आंब्याचा तुटवडा जाणवत असून पेटी मागे ५०० रूपये  महाग मिळत आहेत. सर्वसामान्यांना अक्षय तृतीया नंतर आंबा स्वस्त मिळतो म्हणून खरेदी करण्यासाठी जात असतात. मात्र अक्षय तृतीया नंतरही आंब्याचां भाव तेवढाच असल्याने पेटी मागे पाचशे रुपये दर वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या तरी अजून आंबे महाग असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्याचे दिसत आहे.  यंदा मात्र अवकाळी पाऊस आणि सततच्या वातावरणातील बदलांमुळे बाजारात हापूसची आवक कमी झाली आहे. तसेच तयार हापूस बाजारात कमी उपलब्ध असल्याने भावातही वाढ झाली आहे.

आंब्यांचे भाव

किरकोळ बाजारातील डझनाचे भाव 

 ८०० ते १२०० रुपये

घाऊक बाजारातील भाव

४ ते ६ डझन पेटी -२५०० ते ३००० हजार रुपये५ ते १० डझन पेटी - ३५०० ते ६००० रुपये पेटी

काय आहेत  कारणे

- अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा उत्पन्नावर परिणाम- बाजार पेठेत आंब्यांची आवक कमी- दरवर्षी आठ ते दहा हजार हापूस पेट्यांची आवक- यंदा हापूसची आवक दोन  ते अदीड हजार पेटीपर्यंत- किरकोळ बाजारात एक डझन आंब्यांचां भाव ८०० ते १२०० 

दोनच डझन खरेदी करुन यावे लागले

अक्षय तृतीया निमित्त मार्केट यार्ड बाजारात आंबे खरेदी करण्यासाठी गेल्यावर आंब्याचा भाव प्रचंड होता. त्यात तयार आंबेही मिळत नसल्याने अक्षय तृतीया नंतर आंबे स्वस्त मिळतील म्हणून मंगळवारी मार्केट यार्ड मध्ये आंबे खरेदी करण्यासाठी गेले. आंबे अजूनही त्याच भावात मिळत असल्याने एक पेटी घेण्याऐवजी दोनच डझन खरेदी करुन यावे लागले. - रविना वायदंडे गृहणी

टॅग्स :PuneपुणेAlphonso Mangoहापूस आंबाfruitsफळेMarketबाजारInflationमहागाईMONEYपैसा