शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Pune | डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून मित्राचा खून; आरोपी चोवीस तासांत जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:20 IST

या घटनेच्या अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली...

पिंपरी : डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून ३८ वर्षीय व्यक्तीचा खून केला. या घटनेच्या अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही घटना मंगळवारी (दि.३) रात्री नऊ ते बुधवारी (दि.४) सकाळी दहाच्या दरम्यान घडली. पूर्ववैमनस्यातून दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव राजेश शिवलिंग जाधव (वय ३८, रा. चिंचवड) असे आहे, तर अटक केलेल्या आरोपीचे नाव सोमनाथ सुभाष बडदाळे (वय ४०) असे आहे. याप्रकरणी विकास प्रकाश जाधव (वय ३६, रा. रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सहायक पोलिस निरीक्षक विशाल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी भाड्याने दिलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राजेश जाधव राहत होता. त्याचे आणि आरोपी सोमनाथ यांची मैत्री होती. राजेश एकट राहत असल्याने सोमनाथ त्याच्याकडे कधी कधी येत होता. एकदा दोघांमध्ये झालेल्या वादातून राजेश याने सोमनाथ याला मारहाण केली होती. त्याचा राग सोमनाथच्या मनात होता. पुन्हा दारू पीत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून आणि जुन्या रागातून सोमनाथ याने राजेश याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या केली. रावेत पोलिस ठाण्याच्या पोलिस तपास पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या चोवीस तासांत आरोपीला अटक केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी