मोटारसायकलच्या अपघातात एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST2021-02-14T04:10:42+5:302021-02-14T04:10:42+5:30

या संदर्भात हकिगत अशी की, भरत चंदर काळे (वय ४०, रा. निमोणे) हे आपली मोटारसायकल (एमएच १२, एचएच ९१९१) ...

Killed on the spot in a motorcycle accident | मोटारसायकलच्या अपघातात एक जागीच ठार

मोटारसायकलच्या अपघातात एक जागीच ठार

या संदर्भात हकिगत अशी की, भरत चंदर काळे (वय ४०, रा. निमोणे) हे आपली मोटारसायकल (एमएच १२, एचएच ९१९१) वरून गुनाटहून निमोणेकडे तर संतोष दादाभाऊ गाडे (वय ३८, रा. गुनाट) हे आपली मोटारसायकल (एमएच १२, एसजी ०९७२) वरून निमोणेकडून गुनाट दिशेने जात होते. वेगात असणाऱ्या मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दोन्ही मोटारसायकल चालक डोके, हात, पाय यांना मार लागल्याने गंभीर जखमी झाले. राजेंद्र काळे, अविनाश काळे या युवकांच्या मदतीने गंभीर जखमींना शिरूर येथील दवाखान्यात दाखल केले. भरत चंदर काळे (वय ४०, रा. निमोणे) हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिरूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

अपघातात मयत भरत काळे

Web Title: Killed on the spot in a motorcycle accident