शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

आभासी जगात हरवताहेत मुले, ‘ब्लू व्हेल’ने पालक चिंतेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:26 IST

शालेय विद्यार्थ्यांचा थेट शेवट करणाºया ‘ब्लू व्हेल गेम’ची ग्रामीण भागात चांगलीच धास्ती घेतली आहे. आभासी जगात मुले मोबाईलच्या माध्यमातून हरवत असताना त्यांना सावरायचे कसे यामुळे पालक चिंतेत पडले आहेत.

बारामती : शालेय विद्यार्थ्यांचा थेट शेवट करणाºया ‘ब्लू व्हेल गेम’ची ग्रामीण भागात चांगलीच धास्ती घेतली आहे. आभासी जगात मुले मोबाईलच्या माध्यमातून हरवत असताना त्यांना सावरायचे कसे यामुळे पालक चिंतेत पडले आहेत.संवादाचा अभाव असल्याने इंंटरनेट असणारे मोबाईल या मुलांचे विश्व बनले आहे. त्यामुळे गरजेपुरताच मोबाइल वापरण्याची विद्यार्थ्यांना सवय लावावी. विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी सक्तीने वागण्याची वेळ आली आहे, असे मत काही जाणकारांकडून व्यक्त होत आहे.वर्गातील मित्रांच्या माध्यमातून मोबाइल, संगणक गेमची विद्यार्थ्यांना चटक लागते. त्यानंतर ही मुले या गेमचा आनंद लुटण्यासाठी सायबर कॅफे गाठतात. वाय सिटी, कंडिशन झिरो या गेम्सचा सध्या बोलबाला आहे. इंटरनेटचा तुलनेने वापर अधिक वाढला आहे. काही पालक जागरुकतादेखील दाखवत आहेत. इंटरनेटशी संबंधित शाळेचे प्रकल्प तयार करण्यासह विविध कामांसाठी संगणकाची गरज भासते. त्यासाठी पालक सायबर कॅफेमध्ये विद्यार्थ्यांसमवेत येऊन मार्गदर्शकाची भूमिका बजावतानाही दिसत आहेत.याबाबत येथील स्टार सायबर कॅफेचे सलमान बागवान यांनी सांगितले, की ब्लू व्हेल गेम या परिसरातील विद्यार्थ्यांपर्यंत सुदैवाने पोहचलेला नाही. आम्ही ‘डाउनलोड’ केलेले गेमच मुलांना खेळू देतो. हे गेम खेळण्यासाठी इंटरनेटची गरज नसते. त्यामुळे विनाइंटरनेटचे संगणक विद्यार्थ्यांना उपलब्ध केले जातात. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक सोबत येतात. अल्पवयीन मुले एकटी आल्यास त्यांना येण्याचे कारण विचारले जाते. अश्लील संकेतस्थळापर्यंत येथील लहान मुले पोहचणार नाहीत याची दक्षता घेतली जाते. युवा वर्गाची सायबर कॅफेमध्ये वर्दळ असल्याचे बागवान यांनी सांगितले.सायबर क्षेत्रातील व्यावसायिक दत्तात्रय आदलींग यांनी सांगितले, की महाविद्यालयाचे ओळखपत्र पाहूनच येथे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अनेक विद्यार्थी, युवक प्रकल्प, नोकरी अर्ज भरण्यासाठी येतात. तर अनेक जण चित्रपट ‘डाउनलोड’ करण्यासाठी देखील येतात. चित्रपट पाहण्यासाठी येणारा वर्गदेखील मोठा आहे. अश्लील संकेतस्थळ उघडण्यास मनाई आहे. त्यासाठी सायबर कॅफेतील प्रत्येक संगणकावर नजर ठेवण्यात येते. संगणकाचा चांगला आणि शैक्षणिकच वापर होईल, याची दक्षता घेतली जाते.नकळत होतात चुकीचे संस्कारसध्या संगणकावर इंटरनेट जोडून कामकाज करताना अनेक अश्लील व्हिडीओ, छायाचित्रे आपोआप समोर येतात. हे ‘टॅग’ केलेले अश्लील व्हिडीओ, छायाचित्र नकळत चुकीचा संदेश देतात.जणू नकळत या गोष्टींना प्रोत्साहनच दिले जाते. हे अश्लील व्हिडीओ, छायाचित्रे काढून टाकले जाऊ शकत नाही. काम करताना अनेक वेळा हे आपोआप ‘ओपन’ होतात. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. चुकीचे संदेश, संस्कार यामुळे होण्याची शक्यता आहे, असे कॅफेचालक सलमान बागवान यांनी सांगितले.