किवळेत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By Admin | Updated: September 8, 2016 01:20 IST2016-09-08T01:20:24+5:302016-09-08T01:20:24+5:30

शहरातील सेक्स रॅकेटचे लोन आता ग्रामीण भागात पोहचले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व देहूरोड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने किवळेतील साई लॉजवर

Kidney sex racket exposed | किवळेत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

किवळेत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

देहूरोड : शहरातील सेक्स रॅकेटचे लोन आता ग्रामीण भागात पोहचले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व देहूरोड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने किवळेतील साई लॉजवर सोमवारी छापा टाकून बेकायदा वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. या वेळी १४ मुलींची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पाटील यांनी फिर्याद दिली आहे. साई लॉजचे मालक प्रशांत शेट्टी यांच्यासह आरिफ अल्लाउद्दीन नासर ऊर्फ जॉन (रा. डांगे चौक, थेरगाव), विनोद अशोक भगत (रा. किवळे), संदीप रामअवतार पासवान (रा. किवळे) यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किवळेतील मुकाई चौकाजवळ साई लॉज येथे प्रशांत शेट्टी व त्यांचे इतर साथीदार हे मुलींना वेश्या व्यवसायास प्रोत्साहित करून त्यावर स्वत:ची उपजीविका करीत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखा व देहूरोड पोलिसांच्या साह्याने कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी एका बनावट ग्राहकास लॉजवर पाठवले. तेथे वेश्याव्यवसायासाठी मुली मिळत असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर पथकाने लॉजवर छापा टाकला. विविध खोल्यांत १४ सज्ञान मुली आढळून आल्या. त्यांची मुक्तता केली आहे. त्या वेळी लॉजवर उपस्थित असलेले अरिफ अल्लाउद्दीन नासर ऊर्फ जॉन (रा. डांगे चौक, थेरगाव) , विनोद अशोक भगत (रा. किवळे) संदीप रामअवतार पासवान (रा. किवळे ) यांना ताब्यात घेतले आहे. मुलींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून लॉजवर कुंटणखाना चालवून उपजीविका करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला.
जिल्हा अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या सूचनेनुसार निरीक्षक राम जाधव, देहूरोडचे निरीक्षक अरुण मोरे, सहायक निरीक्षक श्रीमती एस. एस. पाटील (महिला कक्ष), सहायक निरीक्षक सतीश होडगर, उपनिरीक्षक खाडे, हवालदार आर. डी. मिरघे, शंकर जम, सुनील जावळे, दत्तात्रय जगताप, रौफ इनामदार, सुनील बांदल, चंद्रकांत वाघ, ज्योती कांबळे, सुनीता कोरपड, डी. डी. डमरे यांच्या पथकाने कारवाई केली. (वार्ताहर)

Web Title: Kidney sex racket exposed