शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून आठ महिन्यांच्या मुलीचे अपहरण; महिला सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 16:50 IST

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटूंबातील ८ महिन्याचे बाळ एका महिलेने पळवून नेले. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारातील दर्गा जवळ सोमवारी रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देरेल्वे स्टेशनच्या आवारातील दर्ग्याजवळ सोमवारी रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली घटना मुलीच्या शोधासाठी तयार करण्यात आले पोलिसांची ४ पथके

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटूंबातील ८ महिन्याचे बाळ एका महिलेने पळवून नेले. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारातील दर्ग्याजवळ सोमवारी रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली.याबाबत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी सांगितले, की ही २८ वर्षाची महिला, तिचा पती व ८ महिन्याच्या मुलीला घेऊन ३ फेब्रुवारीला पुण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी हडपसर येथे एका ठिकाणी वाढपी म्हणून काम केले. रहायला जागा नसल्याने ते रेल्वे स्टेशन जवळील दर्ग्याजवळ थांबले होते. ५ फेब्रुवारीला त्यांना काही काम मिळाले नाही. रात्री ते दर्ग्याजवळ थांबले असताना एक महिला तेथे आली, तिने त्यांच्याशी बोलत चौकशी केली. नंतर तिने आपल्या भाच्याला बोलून घेतले. मुलीला कपडे दिले व तुम्ही जेवण करून या मी मुलीला सांभाळते असे सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून ते जेवायला गेले. जेऊन परत आले तर ती बाई व मुलगी तेथे नव्हती. त्यांनी सर्वत्र शोध घेतला पण ती कोठेच न सापडल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता स्टेशन जवळील भुयारी मार्गातून मुलीला घेऊन जाताना दिसून आली. या मुलीच्या शोधासाठी पोलिसांची ४ पथके तयार करण्यात आले असून सर्वत्र शोध घेतला जात आहे, असे मनोज खंडाळे यांनी सांगितले.

टॅग्स :Kidnappingअपहरणpune railway stationपुणे रेल्वे स्थानकSolapurसोलापूरPuneपुणे