पुणे : अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या गुंडाला आश्रय देणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलगी आणि गुंडाला पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे गावाच्या फार्म हाऊसमध्ये लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. मुलीला घेऊन पसार झालेल्या गुंडाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.याप्रकरणी किरण अशोक इंदलकर (रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता), कमलेश संपत भगत (रा. तोरणा प्रांगण, वडगाव धायरी), चेतन विजय खेडेकर (रा. कल्पतरु कॉलनी, वारजे जकात नाका), लक्ष्मण आनंदा राऊत (रा. रासकर बिल्डींग, पवार हॉस्पिटलमागे, बालाजीनगर, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत़. मंगळवार पेठ परिसरातील गुंड श्वेतांग निकाळजे याने अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून ७ एप्रिल रोजी पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली़. पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेताना त्यात निष्काळजीपणा दाखविला़.त्यामुळे तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे हस्तांतरीत करण्यात आला़. गुन्हे शाखेने केलेल्या तपासात निकाळजेचा व्यावसायिक भागीदार इंदलकर, भगत, खेडेकर, राऊत यांनी निकाळजेसह मुलीला पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे गावातील चेतन खेडेकर याच्या फार्म हाऊसमध्ये लपवून ठेवल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. पोलिसांचे पथक तातडीने तेथे रवाना झाले. परंतु, तोपर्यंत निकाळजे मुलीला घेऊन पसार झाल्याचे उघडकीस आले. यावरुन त्याला आश्रय देणाऱ्या चौघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. निकाळजेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा,चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, विद्याुलता चव्हाण, यशवंत आंब्रे, विनायक पवार, शंकर पाटील, अजय थोरात, परवेझ जमादार, निलेश पाटील, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन गायकवाड यांनी ही कारवाई केली.
अपहरणकर्त्या गुंडाला आश्रय देणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:01 IST
मंगळवार पेठ परिसरातील गुंड श्वेतांग निकाळजे याने अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून ७ एप्रिल रोजी पळवून नेले.
अपहरणकर्त्या गुंडाला आश्रय देणाऱ्या चौघांना अटक
ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : अल्पवयीन मुलींचे अपहरण प्रकरणविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा,चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल