तरुणाचे अपहरण करून केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST2021-05-23T04:11:42+5:302021-05-23T04:11:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : व्याजाचे पैसे दिले नाही, म्हणून कात्रज परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याचा ...

Kidnapping and beating of a young man | तरुणाचे अपहरण करून केली मारहाण

तरुणाचे अपहरण करून केली मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : व्याजाचे पैसे दिले नाही, म्हणून कात्रज परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दीपक प्रदीपकुमार सिंग (वय २०, रा. कात्रज) आणि निखिल नंदकुमार कदम (वय २३, रा. दत्तनगर रोड, कात्रज) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी २४ वर्षांच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी तरुणाला व्याजाने पैसे दिले आहेत. त्या पैशांचे काही व्याज थकले होते. त्यातून या चौघांनी १८ मे रोजी रात्री या तरुणाचे त्याच्या घरातून जबरदस्तीने अपहरण केले. त्याला गिरीश कदम याच्या स्टेन्जा हॉस्टेलमध्ये तसेच त्यानंतर दीपक सिंग याच्या सुभाष टेरेसमधील फ्लॅटमध्ये डांबून ठेवले. शिवीगाळ करून मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Kidnapping and beating of a young man