शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या युवकाची बारा तासात सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 18:51 IST

बारामती शहर पोलीसांची कामगिरी

ठळक मुद्देअपहरण करणाऱ्यांनी दिले मुलीच्या आत्महत्येचे कारण

पाच कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या लीमटेक (ता.बारामती)येथील युवकाची बारा तासात सुखरुप सुटका करण्यात बारामती शहर पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी रात्री या युवकाचे बारामती एमआयडीसी परिसरातून अपहरण करण्यात आले होते. पृथ्वीराज ज्ञानदेव चव्हाण ( वय- २४ ) याने दिलेल्या फिर्यादवरून या ठीकाणी आरोपी सुनिल लक्ष्मण दडस (वय २६), गौरव साहेबराव शेटे (वय २०) तसेच कारचालक संतोष शरणाप्पा कुडवे (रा.चंदननगर,पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. 

अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ७.१५ ते  ७.३० च्या दरम्यान जळोची रोड पानसरे ड्रीम सिटी च्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत हा प्रकार घडला. कृष्णराज धनाजी जाचक(वय १८,) असे अपहरण केलेल्या युवकाचे नाव आहे.  चारचाकी मध्ये अज्ञात चार जण आले. त्यापैकी एकाने फिर्यादीच्या पायावर बांबूने मारले. त्यानंतर कृष्णराजला जबरदस्तीने गाडीत घातले. सोबत फिर्यादीचा मोबाइल आणि कृष्णराजच्या मोटर सायकलची चावी हिसकावून घेत पळून गेले. तसेच रात्री ९.३७  वाजता कृष्णराजचे वडील धनाजी जाचक यांना कृष्णराजच्या फोनवरून संपर्क साधला. तुझा मुलगा शाळेला पाचगणीला असताना एका मुलीला त्रास दिल्याने तिने आत्महत्या केली आहे. तिची सुपारी आम्हाला मिळाली आहे. तू जर पाच कोटी रुपयांची खंडणी एका तासात दिली नाहीतर मुलाला मुकाल अशी धमकी दिली.

याबाबत शहर पोलीसांना माहिती मिळताच क्षणी चार पथकांनी मिळून रात्री शोधमोहिमेला सुरुवात केली. अपहरण करण्यासाठी वापरलेल्या गाडीचा पिवळ्या नंबर प्लेटवर एमएच १४ असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सीसीटीव्ही कमेऱ्याद्वारे गाडीचा पाठलाग करत मुलाचे वडील धनाजी जाचक यांच्या संपर्कात राहत पोलीस मलवडी येथील डोंगराच्या दरीत पोहचले. या ठीकाणी आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर कृष्णराज याची सुटका करण्यात आली. या प्रकरणात एकुण पाच जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.  पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे,उमेश दंडीले,पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणPoliceपोलिसBaramatiबारामती