शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

काळुसहुन अपहरण केलेल्या चुलत्याचा पुतण्यानेच केला खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:19 IST

शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये सभासद होत नसल्याचा राग मनात धरत आरोपी पुतण्याने चुलत्याचेच अपहरण केले होते. त्यानंतर त्याने चुलत्यावर कोयत्याने वार करत त्यांचा खून केला.

ठळक मुद्देयाप्रकरणी पुतण्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तो चाकण पोलिसांच्या ताब्यात

चाकण : खासगी सामाईक शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये सभासद होत नसल्याचा राग मनात धरून काळूस ( ता.खेड ) येथून अपहरण केलेल्या ७० वर्षाच्या चुलत्याचा पुतण्याने जऊळके गावच्या हद्दीत कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पुतण्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सोनबा गोविंद खैरे (वय ७०) असे खून झालेल्या चुलत्याचे नाव असून त्यांचा मुलगा काळुराम सोनबा खैरे ( वय ३६, रा. काळूस ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संजय मारुती खैरे ( रा. काळुस, ता.खेड, जि. पुणे ) या पुतण्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रविवारी ( दि.२० मे) अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळुस येथील ७० वर्षीय जेष्ठ नागरिकाचे ११ तारखेला अपहरण केल्याची घटना घडली होती. ११ तारखेला सकाळी सोनबा खैरे यांना आरोपी संजय खैरे याने काळूस गावच्या खासगी सामाईक शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये त्याच्या बरोबर सभासद होत नसल्याचा राग मनात धरत स्कॉर्पिओ गाडी क्रमांक ( एम एच १४ - डीए - ५३५३ ) त्यांना बसवून पळवून नेले होते. चाकण पोलीस ठाण्यात या अगोदर सोनबा खैरे हे बेपत्ता असल्याची तक्रार देखील नोंदविण्यात आली होती. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत पवार हे करत आहेत. ========================================

टॅग्स :ChakanचाकणKidnappingअपहरणMurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिस