शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

अपहरण झालेली मुलगी पुन्हा पुणे स्टेशनवरच सापडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:37 IST

मुळची नागपूरमधील कोनवली बारा येथे राहणाऱ्या जयश्रीचे दहा दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्टेशन येथून एका महिलेने अपहरण केले होते.

ठळक मुद्देलोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनमधून अपहरण झालेली पाच वर्षांची मुलगी दहा दिवसानंतर शुक्रवारी सकाळी रेल्वे स्टेशन परिसरातच सापडली. अपहरणकर्त्या महिलेनेच तिला आणून सोडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.   लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात महिला पोलिसांना दिसून आली आहे. जयश्री जयसिंग चव्हाण असे अपहरण झालेल्या मुलीचे आहे. तिचे २१ मेला एका अनोळखी महिलेने अपहरण केले होते. याप्रकरणी जयसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री ही मुळची नागपूर येथील कोनवली बारा येथील राहणारी आहे. तिचे आई वडील जयश्रीसह कामाच्या शोधात पुण्यात आले होते. रेल्वे स्टेशन समोरील दर्ग्यासमोर त्यांची दोन्ही मुले खेळत होती. काही काळानंतर जयश्री तेथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिचा रेल्वे स्टेशन परिसर, एसटी स्थानक परिसर, ससून परिसरात शोध घेतला. परंतु, ती कोठेच सापडली नसल्याने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.       तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले आहे. तसेच पोलिसांकडूनही मुलीचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी जयश्रीचे फोटोही सर्वत्र प्रसारित केले होते. तसेच लोहमार्ग पोलिसांची वेगवेळी पथके तिचा शोध घेत होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास जयश्री पोलिसांना पुणे रेल्वे स्टेशनवर आढळली. त्यानंतर तिला आईवडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी तिच्याकडे विचारणा केली असून तिला एका महिलेने नेले असल्याचे तिने सांगितले. तसेच तिने तिला नीट जेवणही दिले असल्याची माहिती दिल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnagpurनागपूरpune railway stationपुणे रेल्वे स्थानकKidnappingअपहरणPoliceपोलिस