शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण केलेल्या बाळासह आरोपींना कर्जतला पकडले, भीक मागण्यासाठी नेले पळवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 23:27 IST

ससून रुग्णालयाशेजारील फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील सव्वा वर्षाच्या लहान बाळाचे अपहरण करणा-यांचा ६ दिवसांनी छडा लावण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. भीक मागण्यासाठी त्यांनी या बाळाला पळवून नेले होते.

पुणे : ससून रुग्णालयाशेजारील फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील सव्वा वर्षाच्या लहान बाळाचे अपहरण करणा-यांचा ६ दिवसांनी छडा लावण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. भीक मागण्यासाठी त्यांनी या बाळाला पळवून नेले होते.चंदा मनोज ऊर्फ लखन चव्हाण (वय २५) आणि मनोज ऊर्फ लखन चव्हाण (वय २५, रा़ पुणे फिरस्ता) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी नरेंदर बागडी यांनी फिर्याद दिली होती. ते मुळचे राजस्थानमधील असून काही महिन्यांपासून पुण्यात मोलमजुरी करुन ससून रुग्णालया शेजारील फुटपाथवर झोपतात. या घटनेच्या दोन दिवस अगोदर त्यांची पत्नी मनिषा आणि सव्वा वर्षाच्या मुलगा नसीब हे पुण्यात आले होते़. ९ जानेवारीला ते फुटपाथवर झोपले असताना पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान नसीबला या दोघांनी पळवून नेले होते. बागडी हे गरीब असले तरी अपहरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख  यांनी शोधासाठी टीम तयार केल्या. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव त्यांच्या सहका-यांनी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज तपासून सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. बातमीदाराकडून हवालदार प्रमोद मगर यांना हे बाळ कर्जत येथे असल्याची माहिती मिळाली़ खंडणी विरोधी पथकाचे पथक तातडीने तेथे गेले. तेथील एसटी़ बसस्थानकाजवळ चंदा व मनोज चव्हाण हे दोघे जण या बाळाला घेऊन भीक मागत असल्याचे आढळून आले़ या बाळाचे अपहरण केल्यानंतर ते दोघे उरळी कांचन येथे गेले. त्यानंतर ते परत पुण्यात आले़ पुण्यातून एक दिवस पिंपरीत राहून ते लोणावळ्याला गेले़ तेथून ते कर्जतला जाऊन भीक मागत होते. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक समीर शेख, खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक रघुनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गवळी, विठ्ठल शेलार, कर्मचारी प्रमोद मगर, मंगेश पवार, धीरज भोर, अविनाश मराठे, रमेश गरुड, शिवाजी घुले, संतोष मते, भाऊसाहेब कोंढरे, फिरोज बागवान, रणजित अभंगे, एकनाथ कंधारे, प्रदीप शिंदे, नारायण बनकर, शिवरंग बोले, सुधीर इंगळे, हनुमंत गायकवाड यांनी केली.

आणि बाळ आईकडे झेपावले...कर्जत येथे बाळ असल्याची माहिती मिळाल्यावर खंडणी विरोधी पथकाने या बाळाची आई मनिषा हिला आपल्याबरोबर नेले होते. कर्जत एस टी बसस्थानकाजवळ ते जाताच तिने पोलिसांच्या हातातील बाळाला पाहिले़ आणि ती त्याच्याकडे जाऊ लागली़ बाळाने आपल्या आईला पहाताच पोलिसांच्या हातून ते आईकडे झेपावले़ बाळ कुशीत येताच मनिषाच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले़ तिने तेथेच त्याला आपल्या पदराखाली घेऊन दुध पाजले़ त्यानंतर ती पोलिसांच्या पाया पडायला लागली़ हे दृश्य पाहून जमलेले एस टी कामगारही हेलावून गेले. आपले बाळ तुमच्यामुळे मिळाले. आता आम्ही पुण्यात राहणार नाही़ पुन्हा गावाला परत जाऊ़ हा माझा पहिलाच मुलगा आहे. त्याला खुप शिकविणार असल्याचे मनिषा हिने सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे