शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Pune: ढोल-ताशा पथकातील मुलाचे अपहरण करून केला खून; दोघांना अटक, दहा जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 14:07 IST

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे...

पुणे : ढोल-ताशा पथकात सरावासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती देत असल्याच्या संशयावरून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

साईराज लोणकर (वय २५, रा. कोंढवा खुर्द) आणि ओंकार कापरे (२५, रा. कोंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दहा ते अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अधिक माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा कोंढवा येथील शिवनेरीनगर भागात राहतो. शनिवारी रात्री तो ढोल-ताशा पथकात सरावासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने रविवारी त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार कोंढवा पोलिसांत दिली. पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्याने तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

दरम्यान, अल्पवयीन मुलासोबत गेलेला आणखी एकजण बेपत्ता झाला असून, तो घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या. संबंधित अल्पवयीन मुलाचे लोणकर आणि कापरे यांनी अपहरण करून त्याला सासवड येथे नेले. त्या ठिकाणी त्याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप भोसले करत आहेत.

टॅग्स :KondhvaकोंढवाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड