खेड, मुळशी, बारामती सर्वसाधारण प्रवर्गासाठी
By Admin | Updated: August 22, 2014 23:36 IST2014-08-22T23:36:05+5:302014-08-22T23:36:05+5:30
जिल्हा परिषद क्षेत्रतील 13 पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली.

खेड, मुळशी, बारामती सर्वसाधारण प्रवर्गासाठी
पुणो : जिल्हा परिषद क्षेत्रतील 13 पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. खेड, मुळशी, बारामती तालुक्यांचे सभापतिपद सर्वसाधारण गटासाठी राहिले आहे. शिरूरचे सभापतिपद अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आले; मात्र येथून अनुसूचित जमातींचा एकही सदस्य निवडून आलेला नसल्याने त्या आरक्षणामध्ये बदल करावा लागणार आहे.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहा वाजता सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, तहसीलदार रोहिणी आखाडे उपस्थित होते.
अनुसूचित जाती व जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार क्रमाने आरक्षण ठेवले जाते. त्यानुसार पहिल्यांदा मावळ तालुक्याच्या पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी तर शिरूरचे सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात येत असल्याचे रोहिणी आखाडे यांनी जाहीर केले.
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 4 पदे आरक्षित करावयाची होती. त्याकरिता शालेय विद्याथ्र्याच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आल्या. इंदापूर, हवेली, भोर, आंबेगाव या तालुक्यांच्या चिठ्ठय़ा निघाल्या, त्यानुसार ते नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. त्यातून
पुन्हा महिला प्रवर्गासाठी दोन चिठ्ठय़ा काढण्यात आल्या, त्या हवेली व आंबेगावच्या निघाल्या. त्यानुसार हवेली व आंबेगावचे सभापतिपद महिला नागरिकांचा मागास
प्रवर्गसाठी राखीव ठेवण्यात आले. त्यानंतर चिठ्ठय़ा काढून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जुन्नर, पुरंदर,
दौंड, वेल्हा आरक्षित करण्यात
आले. उर्वरित राहिलेले खेड,
मुळशी, बारामती हे तालुके सर्वसाधारण प्रवर्गासाठी ठेवण्यात आले. (प्रतिनिधी)
तालुकाप्रवर्ग
खेडसर्वसाधारण
मुळशीसर्वसाधारण
बारामतीसर्वसाधारण
जुन्नर सर्वसाधारण महिला
पुरंदरसर्वसाधारण महिला
वेल्हासर्वसाधारण महिला
दौंडसर्वसाधारण महिला
इंदापूरनागरिकांचा मागास प्रवर्ग
भोरनागरिकांचा मागास प्रवर्ग
हवेलीनागरिकांचा मागास प्र. महिला
आंबेगावनागरिकांचा मागास प्र. महिला
मावळअनुसूचित जाती महिला
शिरूरअनुसूचित जमाती
..अन् त्यांनी जल्लोष केला
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 4 जागांचे आरक्षण काढताना चिठ्ठय़ांमध्ये खेडसह 5 तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र खेड तालुक्यातील एका महिला सदस्याच्या पतीने त्याला आक्षेप घेतला. तहसीलदार आखाडे यांनी नियमानुसार खेडचा समावेश झाल्याचे स्पष्ट केले. शेवटची चिठ्ठी निघाली तेव्हा खेडचा त्यामध्ये समावेश झाला नाही. खेड अखेर सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आक्षेप घेणा:या पतीमहोदयांनी जल्लोष केला.