ख्याल, ठुमरीने आळंदीत रंगणार मैफल !

By Admin | Updated: February 5, 2015 00:20 IST2015-02-05T00:20:49+5:302015-02-05T00:20:49+5:30

आळंदीकरांना उद्या (दि. ५) ख्याल, ठुमरी असे शास्त्रीय गायनातील प्रकार ऐकण्याची संधी मिळणार आहे.

Khayal, Thumri, Alhande is a concert! | ख्याल, ठुमरीने आळंदीत रंगणार मैफल !

ख्याल, ठुमरीने आळंदीत रंगणार मैफल !

पुणे : आळंदीकरांना उद्या (दि. ५) ख्याल, ठुमरी असे शास्त्रीय गायनातील प्रकार ऐकण्याची संधी मिळणार आहे. गायनातील आक्रमक तालबाजी, स्वरांवर प्रभुत्व व लयकारी, असे गायनातील विविध पैलू समजून घेता येणार आहेत. निमित्त आहे पतियाला घराण्याचे गायक जगविख्यात सूरमणी पं. प्रकाशसिंहजी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीत मैफिलीचे.
ह.भ.प. सर्जेराव गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त ही मैफील आयोजित केली आहे.
पं. प्रकाशसिंहजी साळुंके यांची पतियाला घराण्याची १३वी पिढी आहे. त्यांच्या ६ पिढ्या हैदराबाद दरबारात गायन करीत होत्या. त्यांना पुण्यात स्थायिक होऊन २८ वर्षे झाली असून, संगीतात त्यांना डबल एम.ए. केले आहे.
ख्याल गायकीसह ठुमरी, टप्पा गायकी आणि तराण्यावर त्यांचे उत्तम प्रभुत्व असून, जागतिक स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या
विविध सांगीतिक महोत्सवात त्यांनी आपल्या गायकीचा ठसा उमटविला आहे.
पं. प्रकाशसिंहजी यांना देशविदेशांतील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’त १९७२, १९७४ आणि १९८४ अशी तीन वर्षे आपली
कला सादर करण्याची संधी मिळाली होती. (वार्ताहर)

चांगलं गाणं हे शहरात असो व खेड्यात, ते रुचतं. आळंदीला तसाही संगीताचा मोठा वारसा आहे. भजनातही रागदारी असतेच. तेथे शिकण्यासाठी बाहेरूनही अनेक जण आले आहेत. त्यांना आणखी ‘गाणं’ शिकता येईल.
- पं. प्रकाशसिंहजी साळुंके,
जगविख्यात सूरमणी

Web Title: Khayal, Thumri, Alhande is a concert!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.