‘खराडी-चंदननगरमध्ये भगवा फडकणारच’

By Admin | Updated: February 14, 2017 02:25 IST2017-02-14T02:25:01+5:302017-02-14T02:25:01+5:30

खराडी-चंदननगरमधील जनता हुकूमशाहीला आणि मक्तेदारीला कंटाळली आहे. येथे परिवर्तन अटळ असून खराडीत भगवा फडकल्याशिवाय

'Kharadi-Sachandanagar sa sa saffron ho ho ho' | ‘खराडी-चंदननगरमध्ये भगवा फडकणारच’

‘खराडी-चंदननगरमध्ये भगवा फडकणारच’

पुणे : खराडी-चंदननगरमधील जनता हुकूमशाहीला आणि मक्तेदारीला कंटाळली आहे. येथे परिवर्तन अटळ असून खराडीत भगवा फडकल्याशिवाय शिवसैनिक व मतदार शांत राहणार नाहीत, असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार संतोष भरणे यांनी व्यक्त केला.
भरणे म्हणाले, ‘‘येथील जनतेने आतापर्यंत भरपूर सहन केले आहे. एकाच घरात उमेदवारी देऊन प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याची नेत्यांची सवय जनताच मोडीत काढणार आहे. कार्यकर्त्यांनाही याची जाणीव झाल्याने त्यांनीही या घराणेशाहीला विरोध सुरू केला आहे. कार्यकर्त्यांना पाच वर्षे राबवून घ्यायचे आणि पदे मात्र आपल्याच घरात द्यायची, हे कधी तरी बंद व्हायला पाहिजे. काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठीच निवडणुकीत उभा आहे.
खराडी-चंदननगरमधील सर्व शिवसैनिक प्रामाणिकपणे आणि निष्ठेने भगव्या झेंड्यासाठी काम करत आहेत. ही निवडणूक आता जनतेने आणि तरुणांनी हाती घेतलेली आहे.
शिवसेनेचे उमेदवार संतोष भरणे, संध्या पठारे, मीनाक्षी शेजवळ, सुनील थोरात यांनी बिडी कामगार वसाहत, मथुरा सोसायटी, साईनगरी परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. या वेळी धीरज पठारे, कानिफ भरणे, गुलाब पठारे, सुरेश शेजवळ, ओमकार पठारे, संतोष कोळी, संदीप चव्हाण, राजू राठोड, सुनील ढवळे, अभी सावंत, संदीप सातव, गणेश पठारे, बाबा नवले, संतोष शिदें, पप्पू गायकवाड, तृप्तीताई भरणे, रेखाताई रेधे, विजया वाळके, मंदा जाधव, सुरेखा कुटे यांनी पदयात्रेत सहभाग घेऊन मतदारांशी संवाद साधला.

Web Title: 'Kharadi-Sachandanagar sa sa saffron ho ho ho'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.