राष्ट्रवादीला खिंडार; आझम पानसरे यांचा भाजपमध्ये प्रवेश
By Admin | Updated: January 9, 2017 10:31 IST2017-01-09T10:31:37+5:302017-01-09T10:31:37+5:30
राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व माजी महापौर आझम पानसरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीला खिंडार; आझम पानसरे यांचा भाजपमध्ये प्रवेश
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी - चिंचवड, दि. ९ - भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.ही घटना पिंपरी-चिंचवडमधील राजकारणाची समिकरने बदलणारी आहे, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रवादीला चिहोबाजूनी खिंडार पाडले आहे .
भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी आझम पानसरे यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. बालेकिल्ल्यातच भाजपने राष्ट्रवादीला नामोहरम करण्याचा चंग बांधला आहे. आमदार जगताप तसेच महेश लांडगे यांच्या राष्ट्रवादितील समर्थकानी यापूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे ,आता पानसरे समर्थक वाटेवर आहेत,त्यामुळे राष्ट्रवादीसाठी महापालिका निवडणुकीची वाट बिकट बनली आहे.
राष्ट्रवादीत अस्तित्वासाठी संघर्ष करूनही काहीच हाती न लागल्यामुळे आझम पानसरे गेल्या काही वर्षांपासून नाराज होते. विधान परिषद निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे ते नाराज होते ,त्यांच्या भाजप प्रवेशासाठी आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे या दोघांनीही प्रयत्न केले.