शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली हप्ता वसुली करणाऱ्या खंडणी बहाद्दरास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 19:24 IST

कामगार पुरविल्याचे भासवून खंडणी स्वरूपात हप्ता वसूल करत असल्याचे आले पोलिसांच्या निदर्शनास

ठळक मुद्दे'मोक्कां'तर्गत कारवाई होणार

पिंपरी: एमायडीसीमधील कंपन्यांमध्ये माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली हप्ता वसुली करणाऱ्या खंडणी बहाद्दरास अटक करण्यात आली आहे. महाळुंगे पोलिसांनी हे कारवाई केली. काळुराम उर्फ अजय शंकर कौदरे (वय ३९), कैलास शंकर कौदरे (वय ४२, रा. खारोशी, ता. खेड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे एमायडीसी अंतर्गत कंपन्यांमध्ये माथाडी संघटनेच्या नावाखाली हप्ता वसुली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चौकशी केली असता, आरोपी अजय कौदरे हा माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली कामगार पुरविल्याचे भासवून कंपन्यांकडून खंडणी स्वरूपात हप्ता वसूल करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित कंपनी प्रशासनामधील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. अजय कौदरे व त्याचे साथीदार यांनी कंपन्यांमध्ये येऊन संघटनेचे कामगार कंपनीत प्रत्यक्ष कामास नसताना ते कामावर असल्याचे दाखवून खंडणी वसूल करत होता. याबाबत कोठे वाच्यता केल्यास तुमची वाट लावीन तुमच्यापैकी एखाद्याला जिम जीव गमवावा लागेल.  या भागात कंपनी कशी चालवतात ते बघून घेईन अशी धमकीही अजय कौदरे याने कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार केली. त्यानुसार अजय कौदरे व त्याचे साथीदार यांच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अजय व कैलास कौदरे या दोघांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

'मोक्कां'तर्गत करणार कारवाई

कंपनी प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न राहता हप्ता व खंडणी वसूल करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तक्रार द्यावी या तक्रारींची गंभीर दखल घेऊन पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. पिंपरी -चिंचवड माथाडी कामगार बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी इतर कामगार संघटना व इतर कोणाचा सहभाग या गुन्ह्यात आढळून आल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम म्हणजेच 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया अवलंबण्यात येईल, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटकPoliceपोलिस