केडगाव : गेली ३४ वर्षे प्रत्येक निवडणुकीत पहिले मतदान करणारे देलवडी (ता. दौंड) येथील ९५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक व मुस्लिम समाजाचे गफूर रसूल खान यांच्या आठवणीने ग्रामस्थ व खान कुटुंबीय गहिवरले.खान यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. निधनानंतर प्रथमच मंगळवार (दि. २१) रोजी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या. देलवडी गावामधील खान हे पहिले शिक्षक होते. आज गावामध्ये मतदानास सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली. या निवडणुकीनिमित्त ग्रामस्थांना खान यांची आठवण झाली. कोणत्याही निवडणुकीचे मतदान ७.३० वाजता असले की खान ७ वाजताच केंद्रावर हजर राहायचे. बऱ्याचदा निवडणूक कार्यकर्ते, मतदान प्रतिनिधीसुद्धा त्यांच्यानंतर धावतपळत केंद्रावर यायचे. १९८३ साली शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रथम मतदान करण्याचा अनेक वर्षांचा शिरस्ता खान गुरुजींनी नित्यनियमाने पाळला. यानंतर कोणतीही निवडणूक असली तरी खान गुरुजी व पहिले मतदान असा पायंडाच देलवडी परिसरात होता. त्यांच्या निधनानंतर या पहिल्याच निवडणुकीत अनेक ग्रामस्थांनी त्यांच्या आठवणींना आज उजाळा दिला. या वेळी खान यांचा मुलगा राजू खान म्हणाले, की सुशिक्षित असल्याने वडिलांनी सेवानिवृत्तीनंतर एकदाही मतदान चुकवले नाही. मतदान करण्याचे महत्त्व ते आम्हा कुटुंबीयांना पटवायचे. गेली ५ वर्षे अंथरुणावर असतानासुद्धा त्यांनी २ वेळा मतदान केले होते.
खान यांच्या आठवणीने ग्रामस्थ गहिवरले
By admin | Updated: February 23, 2017 02:30 IST