शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खडसे पुन्हा मंत्री झाले तर आनंदच : गिरीश महाजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:33 IST

जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे खडसेंचा मंत्रिमंडळातील पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देखडसे मंत्रिमंडळात दाखल झाले तर पक्षाला व सरकारला त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा ससून रुग्णालयाची नवीन इमारतीचे पुढील दीड वर्षात लोकार्पण

पुणे: माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नुकतीच भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळातील पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ते मंत्रिमंडळात दाखल झाले तर पक्षाला व सरकारला त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. खडसे मंत्री झाले तर आनंदच होणार आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया जलसंधारण आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. गिरीष महाजन यांची ससून रुग्णालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. महाजन म्हणाले , जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे खडसेंचा मंत्रिमंडळातील पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे वक्तव्य करतानाच या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील असे असे सांगायला देखील ते विसरले नाही.

यापूर्वी खडसे व महाजन यांच्यामध्ये सातत्याने कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याचे चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळाले आहे. मात्र, महाजन यांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात खडसेंच्या मंत्रिमंडळातील चर्चांना उधाण आले आले आहे. त्यापार्श्वभूमीवर महाजन यांचे वाक्य निश्चितच नवीन राजकीय घडामोडींची नांदी ठरु शकते. 

......................     ससून रुग्णालयाची नवीन इमारतीचे पुढील दीड वर्षात लोकार्पणअद्ययावत यंत्रणेमुळे सर्वच स्तरांवरुन ससून रुग्णालयाकडे लोकांचा कल वाढतो आहे. ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीमुळे रुग्णांना अजून चांगल्या दर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवीन इमारतीचा रखडलेला प्रश्न पुढील दीड वर्षात मार्गी लावण्यात येईल. तसेच महात्मा फुले जीवनदायी योजनेत शासकीय रुग्णालयात उपचार झाल्यास संबंधित डॉक्टरला प्रोत्साहनपर निधी देण्यात येणार असल्याची माहिती देखील महाजन यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.    

टॅग्स :PuneपुणेEknath Khadaseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस