खोर-भांडगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे
By Admin | Updated: October 11, 2016 02:00 IST2016-10-11T02:00:39+5:302016-10-11T02:00:39+5:30
खोर-भांडगाव परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक दिवसांपासून या परिसरातील रस्त्यांची खडी उखडल्याने रस्त्यावर खड्डे

खोर-भांडगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे
खोर : खोर-भांडगाव परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक दिवसांपासून या परिसरातील रस्त्यांची खडी उखडल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यातच सध्या झालेल्या पावसामुळे आणखीनच या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भर पडली आहे.
प्रवाशांना मालवाहतुकीदरम्यान अथवा दळणवळणाला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठी कसरत करावी लागते. खोर- भांडगाव रस्त्याबरोबरच पुढे पिंपळाचीवाडी मार्गे नारायणबेट पाटीपर्यंत हा रस्ता वाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. खड्ड्यांमुळे व त्यातच खडी उखडल्याने चालकांना रस्त्याच्या कोणत्या बाजूने गाडी चालवावी, असा प्रश्न पडतोे. खोर-भांडगाव रस्ता हा अष्टविनायक मागार्तील मोरगावचा मयूरेश्वर, जेजुरीचा खंडोबा, सुपा, बारामती या गावांकडे जाण्यासाठी अत्यंत नजीकचा मार्ग असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात दळणवळण होत असते. दौंड सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भातील गंभीर बाबीची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.