शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

खडकवासला सरपंच महिलेवर बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 4:46 PM

खडकवासला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जातीचा बनावट दाखला सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या कारणावरून सरपंच महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देखडकवासला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जातीचा बनावट दाखला सादर करून सरकारची फसवणूकप्रतिभा महेश मते असे गुन्हा दाखल झालेल्या सरपंच महिलेचे नाव

पुणे : खडकवासला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जातीचा बनावट दाखला सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या कारणावरून सरपंच महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हवेली पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. प्रतिभा महेश मते असे गुन्हा दाखल झालेल्या सरपंच महिलेचे नाव आहे. अशोक लक्ष्मण मते (वय ६५, रा. तुकाईनगर, सिहंगड रस्ता) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य निवडणूक आयोगाने २०१२ ते २०१७ कालावधीकरिता खडकवासला ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली होती. या निवडणूकीमध्ये एकूण १५ सदस्य निवडून आले. इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी सरपंचपद राखीव होते. प्रतिभा मते यांनी माहेरच्या नावाने इतर मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र अर्जासोबत जोडले. मागासवर्गीय महिला उमेदवार राखीव पदासाठी प्रचार केला आणि त्या राखीव पदावर निवडणूक जिंकल्या. मात्र ग्रामस्थांनाच त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत शंका आल्याने माहिती अधिकारांतर्गत जात पडताळणी समितीकडून माहिती मागविली असता प्रतिभा मते यांनी इतर मागासवर्गीय जातीचे खोटे प्रमाणपत्र तयार करून  निवडणुकीच्या वेळी बनावट प्रमाणपत्र सादर केले. जात पडताळणी समितीने मते यांचा जातीचा दाखला रद्द ठरविला. जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांचे सरपंचपद रद्द करण्यात आले होते. खोट्या व बनावट जात वैधता प्रमाणपत्रावर शासनाच्या राजचिन्हाच्या शिक्क्याचा वापर केल्याने अशोक मते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.  या याचिकेत सरकार व मतदार यांची फसवणूक करण्यात आली असून तसा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार हवेली पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे