शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासल्यात झालंय बनावट मतदान..! तब्बल ७५ जणांनी केलंय फेक मतदान तर ५३ मत बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 18:10 IST

khadakwasala Vidhan Sabha Election Result 2024

धनकवडी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुतीला भरघोस प्रतिसाद मिळाला, दरम्यान निकालानंतर बनावट मतदान, बाद मतदान, नोटा मतदान, टपाली मतदान, गृह मतदान, अनामत रक्कम जप्त अशा अनेक आकडेवारी समोर येत आहे, अनेक मतदार यावर्षी पहिल्यांदा मतदान करत होते; मात्र त्या मतदारांना मतदानासाठी गेल्यानंतर आपले नाव न सापडल्याच्या घटना समोर आल्या तर काहींना त्यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचे दिसून आले आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात ७५ जणांनी बनावट (फेक) मतदान केलं तर ५३ मतदारांचे मतदान बाद करण्यात आले.काय आहे बनावट (टेंडर व्होट) मतदान?एखादा मतदार मतदान केंद्रावर जाण्यापूर्वीच त्याच्या नावाने दुसऱ्या कोणीतरी मतदान करून गेल्याचे आढळून येते. अशा वेळी संबंधित मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येतो. निवडणूक अधिकाऱ्याकडे १७ ब क्रमांकाचा तक्रार अर्ज करून मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र, निकालावर परिणाम करण्याएवढी अल्प तफावत असल्यास हे मतदान विचारात घेऊन मतांची मोजणी करण्यात येते.खडकवासल्यात ५३ मतपत्रिका बादनिवडणूक काळात कर्तव्यावर असलेल्या मतदारांना, तसेच ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदार, लष्करी सेवेत कर्तव्यावर असलेल्या जवानांना टपाली मतदानाचा अधिकार आहे. खडकवासल्यात ८२० टपाली मतदान झाले होते. त्यापैकी ५३ मतपत्रिका बाद करण्यात आल्या आहेत.मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मतदार यादी सदोष करता आली नाही. मतदानाच्या दिवशी मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पाहायला मिळाल्या. अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत तर अनेक मयतांची नाव अजूनही मतदान याद्यांमध्ये होती तर दुसरीकडे अनेकांकडे मतदान कार्ड होते, पण मतदार यादीत नावेच नव्हती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीतून नाव गायब झाल्याने अनेकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावं लागलं. मागील काही निवडणुकांमध्ये निवडणूक यादीतून नाव गायब होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अपडेट करण्याचं काम करण्यात येतं. मात्र या मतदार याद्या अपडेट होताना अनेक नाव गाळली जात असल्याचं समोर आला आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024khadakwasala-acखडकवासलाVotingमतदानmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग