खडकवासला, कुकडी होतेय रिकामे

By Admin | Updated: May 25, 2014 05:08 IST2014-05-25T05:08:51+5:302014-05-25T05:08:51+5:30

खडकवासला प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठा गेल्या दोन महिन्यांत तब्बल साडेआठ टीएमसीने घटला आहे.

Khadakavasala, Cucumber is empty | खडकवासला, कुकडी होतेय रिकामे

खडकवासला, कुकडी होतेय रिकामे

पुणे : खडकवासला प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठा गेल्या दोन महिन्यांत तब्बल साडेआठ टीएमसीने घटला आहे. मुठा खोर्‍यातील खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला ही धरणे मागील वर्षी झालेल्या चांगला पाऊस झाल्याने पूर्ण क्षमतेने भरलेली होती. त्यामुळे यावर्षी पावसाळा लांबल्यानंतरही शेती आणि पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा होता. तसेच पाटबंधारे विभागाकडून शहराला पाणी पुरवठयासाठी १५ जुलै पर्यंतचा पाणीसाठा राखून ठेवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या कमी झालेल्या आठ टीएमसी मधील तीन टीएमसी पाणी महापालिकेस तर उर्वरीत पाणी शेतीसाठी आणि या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी सोडण्यात आले आहे. तर या प्रकल्पातील वरसगाव आणि टेमघर धरणाची पातळी एक टीएमसीहून अधिक खाली गेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Khadakavasala, Cucumber is empty