पुणे-सातारा महामार्गावर जागोजागी खड्डेच खड्डे
By Admin | Updated: December 26, 2016 02:46 IST2016-12-26T02:46:25+5:302016-12-26T02:46:25+5:30
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर पुलांचे, रस्त्यांचे अपूर्ण आणि निकृष्ट कामांमुळे पडलेले खड्ड्यांमुळे महामार्गावर वारंवार

पुणे-सातारा महामार्गावर जागोजागी खड्डेच खड्डे
भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर पुलांचे, रस्त्यांचे अपूर्ण आणि निकृष्ट कामांमुळे पडलेले खड्ड्यांमुळे महामार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होते. याकडे महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या कांजळे व मांढरदेव येथील काळुबाईच्या यात्रेमुळे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
महामार्गाचे काम चार-पाच वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. अनेक पुलांची व रस्त्यांची खोदाई करून काम सुरू आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. शनिवार, रविवार या सुट्यांच्या दिवशी शिंदेवाडी ते वर्वे गावापर्यंत कोंढणपूर फाटा, कांजळे फाटा, दुर्गा फाटा, चेलाडी फाटा, नारायणपूर फाटा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. तासन्तास वाहनचालकांना यात अडकून पडावे लागत आहे. (वार्ताहर)