शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

‘यशाची गुरुकिल्ली’ने दिला विद्यार्थ्यांना आत्मविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:42 AM

आज करिअरचे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. त्यामधून आपला कल जाणून घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा हे विद्यार्थ्यांनी संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर आणि ‘लोकमत’ आयोजित ‘यशाची गुरुकिल्ली’ या कार्यक्रमातून जाणले व सर्वच विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी एक नवा आत्मविश्वास मिळाला.

पुणे : आज करिअरचे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. त्यामधून आपला कल जाणून घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा हे विद्यार्थ्यांनी संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर आणि ‘लोकमत’ आयोजित ‘यशाची गुरुकिल्ली’ या कार्यक्रमातून जाणले व सर्वच विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी एक नवा आत्मविश्वास मिळाला. एमईएस आॅडिटोरियम १३१, मयूर कॉलनी, कोेथरूड, पुणे येथे बुधवारी झालेल्या या सेमिनारला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी संजय घोडावत विद्यापीठाचे डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी, डॉ. वाय. एल. गिरी आणि ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक जय तिवारी आदी उपस्थित होते. बारावी व पदवी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध करिअरच्या संधी व त्याबाबत माहिती, उच्च शिक्षणातील विविध संधी कशा मिळवाव्यात, प्रवेश प्रक्रिया, योग्य महाविद्यालय व विद्यापीठ कसे निवडावे? त्यासाठी आवश्यक तयारी तसेच स्वयंप्रोत्साहनाची तंत्रे याबाबत संजय घोडावत विद्यापीठाच्या मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या प्रो. डॉ. वाय. एल. गिरी यांनी विद्यार्थी व पालकांना सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी संजय घोडावत विद्यापीठाची माहिती उपस्थितांना दिली. अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन, कला, विज्ञान, वाणिज्य या विभागांतर्गत अभ्यासक्रम विद्यापीठामार्फत राबविले जातात. नावीन्य व गुणवत्तेचा ध्यास घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ज्ञानासोबत विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित व्हावी यासाठी उपक्रमशील प्रयत्न सातत्याने विद्यापीठामार्फत केले जातात. उत्तम करिअर घडविण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठाची मदत घ्या, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.यानंतर विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्यात आले. या वेळी संजय घोडावत विद्यापीठाचे राजेश वशिकर, अभिजित लाटकर उपस्थित होते.उपस्थित विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉद्वारे विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गंगाळे यांनी केले.>लकी ड्रॉ विजेतेमिथिलेश टेहरे, रेवती हिंगमिरे, अनुराग निमसालकर, अक्षय पाटील, रिया जोशी, पूजा मारणे, रोहित गोरडे, अभिनव पाटील, अभिषेक उंडाळे, दक्ष चंसोरिया.

टॅग्स :Lokmatलोकमत