कळमोडी धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2015 04:05 IST2015-07-27T04:05:53+5:302015-07-27T04:05:53+5:30

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आरळा नदीवरील कळमोडी धरण १००% भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे

The key is to fill the dam | कळमोडी धरण भरले

कळमोडी धरण भरले

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आरळा नदीवरील कळमोडी धरण १००% भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. शनिवार दि.२५ रोजी रात्री १० वाजता धरणाच्या सांडव्यावरून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता दीड टीएमसी असून, पुणे जिल्ह्यातील धरणामध्ये प्रथमच धरण भरण्याचा मान कळमोडीने पटकावला आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता डी. जी. कांबळे, तसेच शाखा अभियंता एस. जी. बारवे यांनी दिली आहे. कळमोडी धरण भरल्यामुळे चासकमान
धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. १ जूनपासून धरण परिसरात ४१० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: The key is to fill the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.