शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नव्वदीच्या उंबरठ्यावरही केली कोरोनावर मात; शरणव्वा आजींची धैर्यकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 06:00 IST

पक्षाघात, रक्तदाबालाही ठेवले आहे धाकात

पुणे : रास्ता पेठेतल्या शरणव्वा आजींनी नव्वदीच्या उंबरठ्यावर असताना कोरोनाचा हल्ला परतवून लावला. अवघ्या ६ दिवसांत कोरोना पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह झालेल्या शरणव्वा दोडमणी आजींनी गेली अनेक वर्षे पक्षाघात आणि रक्तदाब या दोन आजारांनाही आपल्या धाकात ठेवले आहे.

बरोबर होळी पौर्णिमेच्या दिवशी आजींची टेस्ट पॉझिटिव्ह आली. मुलगा, सून, दोन्ही नातू निगेटिव्ह होते. डॉ. सुहास कलशेट्टी यांनी सीटी स्कॅनचा स्कोर पाहिला, तो होता १२. आजींना त्यांनी लगेच दाखल करून घेतले व उपचार सुरू केले. तेव्हा आजींची ऑक्सिजन पातळी कमी-जास्त होत होती.

रुग्णालयात दाखल होताच आजींनी उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. वेळेवर गोळ्या, औषधे, साधेच पण वेळेवर खाणे व डॉक्टरांचे प्रत्येक म्हणणे ऐकणे.  तिसऱ्याच दिवसांपासून ऑक्सिजन पातळी सुधारली. स्कोर कमी व्हायला सुरुवात झालीच होती. सहाव्या दिवशी आजी व्यवस्थित होत्या. टेस्ट केली ती निगेटिव्ह आली. त्यांना लगेच डिस्चार्जही मिळाला.

साधा आहार

आजींचे नातू अनिकेत दोडमणी सांगतात, आजी फार धीराची आहे. ती कशालाच घाबरत नाही. साधी भाजी-भाकरी हाच तिचा आहार आहे. तिला रक्तदाब आहे. त्याच्या गोळ्याही वेळेवर घेऊन तिने तो नियंत्रणात ठेवला आहे. दोन वर्षांपूर्वी पक्षाघाताने तिच्या शरीराची उजवी बाजू लुळी पडली. पण तिने त्यावरही धीराने मात केली व आता ती बाजू काही प्रमाणात कार्यरत झाली आहे. कोरोनावर ती मात करेल अशी आमची सर्वांचीच खात्री होती.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस