शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, महाविद्यालय ९ आॅगस्टला बंद ठेवण्याचा विचार : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 21:00 IST

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना वाहतुक कोंडी किंवा इतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडून त्यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव प्राप्तखाजगी किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान टाळावे असे आवाहन

पुणे: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीबाबत प्रशासन सकारात्मक असून सकल मराठा समाजाने सुध्दा शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. खाजगी किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी केले. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर येत्या ९ आॅगस्ट रोजी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार असल्याचे जिल्हाधिका-यांनी नमूद केले. मात्र,अद्याप शाळा महाविद्यालेय बंद बाबत अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत राम बोलत होते. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, मराठा क्रांती मोर्चाचे समन्व्यक राजेंद्र कोंढरे, बाळासाहेब अमराळे, राहूल पोकळे, विराज तावरे, रघुनाथ चित्रे, तुषार काकडे, युवराज दिसले, हर्षल लोहकरे आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनातर्फे मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्जयोजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी भूमिका मांडली. येत्या ९ आॅगस्ट रोजीचे आंदोलन शांततापूर्ण असेल तसेच रास्ता रोको करण्याचे नियोजन नसल्याचे सांगितले.  मराठा आरक्षण प्रश्नी आत्महत्या करण्याचे प्रकार दुदैर्वी आहेत. मृत्यूमुळे होणारे नुकसान कोणीही भरुन काढू शकत नाही,त्यामुळे विद्यार्थी तसेच तरुणांनी चुकीचे पाऊलू नये,असे आवाहन नवल किशोर राम यांनी केले.त्याचप्रमाणे राज्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होण्यामध्ये मराठा समाजाचे योगदान मोठे आहे. राज्यातील सर्वधर्मसमभाव, शांतता, एकोपा कायम ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे,असेही राम यांनी सांगितले.महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना वाहतुक कोंडी किंवा इतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. जिल्हा परिषदेकडून त्यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव प्राप्त झाला आहे,असेही राम यांनी नमूद केले.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही सर्वांची जबाबदारी असून सर्वांमध्ये संवाद कायम राहीला पाहिजे, तसेच तरुणांनी चुकीच्या पध्दतीने आंदोलन करु नये,असे आवाहन संदीप पाटील यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाcollegeमहाविद्यालयMaratha Reservationमराठा आरक्षण