लाळगेवाडी शाळेस ठोकले टाळे
By Admin | Updated: November 27, 2014 23:10 IST2014-11-27T23:10:17+5:302014-11-27T23:10:17+5:30
लाळगेवाडी (ता. दौंड) परिसरातील प्राथमिक शाळा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एकाच शिक्षकावर सुरूआहे.

लाळगेवाडी शाळेस ठोकले टाळे
कुरकुंभ : लाळगेवाडी (ता. दौंड) परिसरातील प्राथमिक शाळा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एकाच शिक्षकावर सुरूआहे. याबाबत पंचायत समितीकडे वारंवार दुस:या शिक्षकाची मागणी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शाळेला टाळा ठोकला.
येथील जिल्हा परिषद शाळा इयत्ता 1 ली ते 4 थी र्पयत आहे. या शाळेत पूर्वीपासून दोन शिक्षक कार्यरत होते. त्यातील एका शिक्षकाची बदली गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी झाली. तेव्हापासून या शाळेत एक शिक्षक मुलांना शिकवत आहेत. याबाबत ग्रामस्थ आणि व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकारी संगीता शिंदे यांच्याकडे लेखी कळविले होते. परंतु याकडे अद्याप लक्ष देण्यात आले नाही. यामुळे एकाच शिक्षकाला इयत्ता 1 ली ते 4 थीर्पयतच्या मुलांना शिक्षण द्यावे लागत असल्याने अतिरिक्त ताण पडत आहे. तसेच मुलांचा वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच्या व्यतिरिक्त या शिक्षकाला निवडणूक व कार्यालयीन कामकाज व अन्य कामे करावी लागत आहेत. परिणामी लाळगेवाडी गावातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या वेळी माजी सरपंच हरिदास लाळगे, भानुदास गरदडे, नीलेश लाळगे, दिलीप लाळगे, बापू गरदडे, दादा लाळगे, दत्ता जांबले, शिवाजी सूर्यवंशी, माजी उपसरपंच बापूराव गरगडे, ग्रामपंचायत सदस्य गणोश लाळगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
(वार्ताहर)
4शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब गरगडे म्हणाले, की शाळेला एक शिक्षक आहे. याबाबत आम्ही गटशिक्षणाधिकारी संगीता शिंदे यांच्याकडे गेल्या आठवडय़ात लेखी अर्ज केला होता. त्या वेळी चार दिवसांत शिक्षक देतो, असे आश्वासन देण्यात आले; परंतु गेले आठ दिवस लोटले, तरी शिक्षक मिळाला नसल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. तेव्हा येथून पुढे मुलांच्या होणा:या शैक्षणिक नुकसानीस शिक्षण विभाग जबाबदार राहील, असे शेवटी गरगडे म्हणाले.