शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कवठे येमाई हिट अँड रन: चुकीच्या बाजूने येत भरधाव गाडीची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 12:32 IST

पुणे येथे र्पोशो अपघात प्रकरण गाजत असताना शिरूर तालुक्यातही अशी घटना घडली आहे....

कवठे येमाई (पुणे) : कवठे यमाई (ता. शिरूर) येथे एका मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी करून ढाब्यावरून उलट्या दिशेने येणाऱ्या चारचाकी गाडीने धडक दिल्याने एका निष्पाप तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे येथे र्पोशो अपघात प्रकरण गाजत असताना शिरूर तालुक्यातही अशी घटना घडली आहे.

कवठे यमाई येथे अष्टविनायक महामार्गावर एका धाब्याच्या जवळ हा अपघात बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास झाला. फिर्यादी अमोल गोरक्ष येठेकर (वय 34 वर्षे, व्यवसाय शेती, रा. मु. पो. गुंडेगाव, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली असून यामधे दिपक जालिंदर येठेकर (वय ३३ ) याचा मृत्यू झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठे येमाई - पारगाव रस्त्यावर फिर्यादी यांचा चुलत भाऊ दिपक हा मोटार सायकल चालवित जेवणाचा डब्बा आणण्याकरिता कामगार जात होता. त्यावेळी कवठे येमाई बाजूने पारगावकडे राँग साईडने धाब्यावरून येणाऱ्या इको गाडीने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दिपक येठेकर याचा मृत्यू झाला असून पाठीमागे बसलेला रंगनाथ आढाव यांना जखमी झाले आहे.

चारचाकी गाडी चालविणारे तरुण हे एका मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी असल्याने धाब्यावर मद्य सेवन करीत फार्महाऊस वर बकऱ्यावर ताव मारायला निघाल्याची चर्चा परीसरात आहे. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी मात्र एका गरीब मजुराच्या जीवावर बेतली असून गाडी चालक पसार झाला आहे. गाडीचा मालक कोण? चालक कोण? याचा तपास पोलिस करून आरोपीला गजाआड करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे . या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहेत

टॅग्स :AccidentअपघातDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह