कात्रजला पर्यटनस्थळाची ओळख
By Admin | Updated: February 14, 2017 02:13 IST2017-02-14T02:13:04+5:302017-02-14T02:13:04+5:30
मी एकटा नगरसेवक असताना कात्रज परिसराला पर्यटनस्थळ बनवले. हाच विकास पुढील पाच वर्षात या संपूर्ण परिसरात आम्हाला करायचा आहे.

कात्रजला पर्यटनस्थळाची ओळख
कात्रज : मी एकटा नगरसेवक असताना कात्रज परिसराला पर्यटनस्थळ बनवले. हाच विकास पुढील पाच वर्षात या संपूर्ण परिसरात आम्हाला करायचा आहे. त्यामुळे प्रभाग क्रंमाक ३८ मधील चारही उमेदवाराला सुज्ञ मतदारांनी निवडुन द्यावे आत्मविश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ३८ मध्ये मनसे उमेदवार मंगेश रासकर, शैला गुजर, शंकुतला वसंत मोरे, विकास बोडसिंग यांच्या प्रचारादरम्यान नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितले, की
मोरे म्हणाले, मी विरोधी पक्षाचा नगरसेवक असताना देखील विकासकामे करून दाखवली, ज्याच्या १० टक्के देखील काम सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना करता आली नाहीत. मी केलेली कामे पुणे महापालिकेला निधी मिळुन देत आहेत. याचे उदाहरण म्हणजे कात्रजची फुलराणी. ही निवडणूक आम्ही फक्त विकासाच्या मुद्दयावर लढवत असून भागातील सुज्ञ मतदार विकासालाच पसंती देतील, असा ठाम विश्वास वसंत मोरे यांनी ठिकठिकाणी झालेल्या कोपरा सभेत व्यक्त केला.
सुखसागरनगर,राजीव गांधी नगर,बालाजीनगर या परिसरामध्ये पदयात्रा व कोपरा सभा घेण्यात आल्या आहेत.या पदयात्रेमध्ये संजय मोरे, गुजरवाडीचे उपसरपंच दीपक गुजर, योगेश खैरे, जंयत गिरी, विकास नाना फाटे, अमोल काकडे, नितीन जगताप, बाळकृष्ण फाटे, बाळासाहेब फाटे, शंकरराव शेलार, किरण गुजर, धोंडीबा गुजर, कृष्णा शेलार, सुहास देशमुख, नितीन शेलार, यांच्यासह भागातील अनेक नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.